चंद्रपूर : वीज कोसळून आई व दोन मुलींचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना समोर आली आहे. चंद्रपूर शहरालगत असलेल्या वरवट या गावात ही घटना घडली. संगीता रामटेके 40, रागिणी रामटेके 17 व प्राजक्ता रामटेके 14 असे मृतकांची नावे आहेत.
दुपारच्या सुमारास आई सह दोन्ही मुली घरासमोरील अंगणात बसून असताना अचानक वीज कोसळली. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूविषयी अजूनही सस्पेन्स कायम आहे.
.वीज कोसळल्याने किंवा विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाला नंतरच तिघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलीस विभाग सांगत आहे. पुढील तपास दुर्गापूर पोलिस करीत आहे.