अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी संदर्भात ताबडतोब शेतकऱ्यांना गावकऱ्यांना मदतीचा हात द्या महसूल विभाग जिल्हा परिषद तसेच कृषी विभागाने ताबडतोब त्या संदर्भात उपाययोजना कराव्या अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आकाश फुंडकर यांनी दिले.
अकोला तालुका मूर्तिजापुर तालुका तसेच तेल्हारा तालुका इथे मोठ्या प्रमाणात जवळपास 25 गावांमध्ये ढगफुटी मुळे फार मोठे नुकसान झाले असून यासंदर्भातली प्राथमिक माहिती घेऊन त्यांना वेगवेगळ्या सुविधा देण्याच्या सूचना पालकमंत्री नामदार आकाश फुंडकर यांनी दिली असून या संदर्भात त्यांनी जिल्ह्याचे खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भाऊ भारसाकले, तसेच भाजपा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली असून वेगवेगळ्या सामाजिक संघटना यांच्याशी चर्चा करून वेगवेगळ्या विभागाशी चर्चा व अडचणी समजून त्या संदर्भात उपाय योजना संदर्भात सूचना केल्या आहे खासदार धोत्रे तसेच आमदार सावरकर यांनी अनेक सूचना दिली असून त्याचे तरुण पालन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनावर दिले आहे.
नैसर्गिक आपत्ती सोबत हिंदू सण सुरू असून त्यासंदर्भात सुद्धा लक्ष देण्याचे आदेश दिले आहे