ब्रह्मपुरी/ प्रतिनिधी:- डॉ. पंजाबराव देशमुख कन्या कनिष्ठ महाविद्यालय तथा डॉ. पंजाबराव देशमुख कॉन्व्हेंट ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न ,महामानव,भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाशभाऊ बगमारे तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा कॉन्व्हेंटच्या प्राचार्या मनिषाताई बगमारे कॉलेजच्या प्राचार्या शारदाताई ठाकरे, नीलिमा गुजेवार ,प्रा. कु. एच .के.बगमारे ,गोवर्धन दोनाडकर, निशा ठाकरे ,अश्विता सयाम,प्रगती शेंडे,अंकुश ठाकरे, कामिनी कन्नमवार, घर्षना सेलोकर आदी मान्यवर उपस्थित होते. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त बाबासाहेबाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील गोर गरीब, वंचित, पिडीत, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि स्वाभिमान साठी लढण्याचा मार्ग दाखविला. शिका, संघटित व्हाआणि संघर्ष करा, या बाबासाहेबाच्या मंत्राने बहूजनाच्या कित्येक पिढ्याचे कल्याण झाले असे मत आपल्या मनोगतातून शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाशभाऊ बगमारे यांनी व्यक्त केले. व उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन व आभार गोवर्धन दोनाडकर यांनी केले.