कर्मयोगी गाडगेबाबा
समाजसुधारक थोर
आधुनिक विचारांचा
त्यांनी वाढविला जोर!
दाखविली माणसाला
खूण माणूसपणाची
सांगितली घालवाया
रूढी परकेपणाची!
अंधश्रद्धांना आव्हान
दिले निर्भय होऊन
झुगारले चमत्कार
प्राण पणाला लावून!
राखरांगोळी घराची
व्यसनेच करतात
खूश कोणते बा देव
पशुहत्येने होतात?
पढविली अडाण्यांना
रीत शुद्ध साधकाची
शिक्षितांना दिली दीक्षा
प्रज्ञा, शील, विवेकाची!
चूड लावून दंभांना
गढी पाडली भेदाची
रुजवली जनी, मनी
थोरी समतावादाची!
विनविले समस्तांना
करा स्त्रियांचा सन्मान
कृष्ण भगवानाआधी
आहे देवकीचा मान!!
- महादेव भोकरे, वडूज (सातारा)
9921515594
आपल्या प्रतिक्रिया द्या....
=================================
Post Views:
43
FaceBook Page
संबंधित बातम्या