कारंजा : स्थानिक आदर्श जय भारत सेवाभावी संस्था (रजी. नं.433/13420)काळी कारंजा ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर भगवान गरड हे राजकारणापासून अलिप्त राहून स्वखर्चाने फक्त आणी फक्त सामाजिक कार्य करीत असतात .
त्यामुळे आदर्श जय भारत सेवाभावी संस्थेने डॉ ज्ञानेश्वर भगवान गरड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, येत्या गुरुवार,दि ०३/११/ २०१२ रोजी सायंकाळी ठिक ०६ : ०० वाजता स्थानिक नगर परिषद मुल्जीजेठा म्युनिसिपल हायस्कूलचे प्रागंणात चिंचखेड (वढवी ) येथील श्री संत एकनाथ महाराज सांप्रदायिक भजनी मंडळाचे साथसंगतीने, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर महाराज खोडे यांच्या व्यसन मुक्तीमेळावा तथा किर्तनाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे . सदर्हू मेळाव्यात शेकडो व्यसनाधिन व्यक्तिंना व्यसनमुक्त करण्याचा संस्थेचा संकल्प आहे. तसेच मेळाव्यापूर्वी गुर गजानन महिला भजनी मंडळ कारंजा आणि विघ्नहर्ता महिला भजनी मंडळ , श्री बालाजी भजनी मंडळ कारंजा यांचे सुमधून गायनाचा कार्यक्रम होईल तसेच मेळाव्यात व्यसनमुक्ती कार्यकर्ते यांचा सत्कार सुद्धा घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ इम्तियाज लुलानिया यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेला दिली असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले असून ह्या वृत्ताद्वारे जास्तित जास्त कारंजेकरांनी हभप मधुकर महाराज खोडे यांच्या किर्तनाचा लाभ घेण्याचे डॉ इम्तियाज लुलानिया यांनी कारंजेकरांना आवाहन केले आहे .