गडचिरोली, दि.१७: शासनाचे दिनांक 13 सप्टेंबर 2022 चे पत्रान्वये प्राप्त निर्देशानुसार दिनांक17 सप्टेंबर 2022 ते 2 आक्टोंबर 2022 या कालावधीत “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा ” आयोजीत करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते. त्यानुसार सिरोंचा तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयीन विभागाअंतर्गत जनतेला एकुण 14 प्रकारच्या सेवा ज्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नविन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण – मदत व पुनर्वसन विभाग (२) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना- तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थाना लाभ देणे – कृषी / महसुल विभाग (३) प्रलंबीत फेरफार नोदींचा निवटारा करणे – महसुल विभाग (४) पात्र लाभार्थाना शिधापत्रीकांचे वितरण – अन्न व नागरी पुरवठा विभाग (५) विवाह नोदणी प्रमाणपत्र देणे – ग्राम विकास-नगर विकास/आरोग्य विभाग (६) मालमत्ता हस्तांतरण नोद घेने- ग्राम विकास विभाग/नगर विकास विभाग (७) नव्याने नळ जोडणी देणे- पा.पु.विभाग/ नगर विकास विभाग (८) मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे- ग्राम विकास विभाग व नगर विकास विभाग (९) प्रलंबीत घरगुती विद्युत जोडणीस मंजूरी देने – महावितरण (१०) मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडनिमध्ये नविन मालमत्ताधारकाचे नांव नोदवीने- महावितरण (11) बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सिंचन विहरीकरीता अनुसुचीत जमातीच्या लाभार्थाची ऑनलाईन नोदणी करणे –आदीवासी विकास विभाग/ग्रामविकास विभाग (१२) अनुसुचीत जमातीच्या लाभार्थाना प्रलंबीत वन हक्क पटटे मंजूरी करणे (अपील वगळुण) – आदीवासी विकास विभाग व महसुल विभाग (१३) दिव्यांग प्रमाणपत्र देने – सामाजिक न्याय विभाग/ आरोग्य विभाग (१४) नॉन क्रिमिलीयर प्रमाणपत्र देने – महसुल विभाग इत्यादी सेवाबाबत दिनांक 10 सप्टेंबर 2022 रोजी शासनाचे संकेतस्थळावरील प्राप्त झालेल्या व प्रलंबीत असलेल्या संदर्भ/अर्ज/तक्रारी यांचा निपटारा सदर कालावधीत करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते.
त्यानुसार तहसिल कार्यालय सिरोंचा अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी तहसिल कार्यालयाचे सभागृहामध्ये तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख यांचे उपस्तिीालत सकाळी 11-00 वाजता सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचा शुभारंभ मा. श्री जितेंन्द्र शिकतोडे, तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच श्री विश्वास पाटील, मुख्याधिकारी नगर पंचायत कार्यालय सिरोंचा तसेच श्री पांचाळ कृषी अधिकारी पंचायत समिती सिरोंचा डॉ. वलके, वैद्यकीय अधिक्षक, शासकीय रुग्नालय सिरोंचा, श्री पटले, बाल विकास प्रकल्प सिरोंचा तसेच तहसिल कार्यालय सिरोंचा येथींल नायब तहसिलदार श्री सय्यद, श्री पुप्पलवार, श्री तोटावार तसेच श्री मांडवगडे तसेच कार्यालयीन कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरीक तसेच बरेच लाभार्थी उपस्थित होते.
उपस्थित लाभार्थाना कार्यकमाचे वेळी रोमपल्ली या गावातील अनुसुचीत जमातीच्या लाभार्थाना प्रलंबीत वन हक्क पटटे मंजूरी च्या आठ प्रकरनामध्ये 7/12 चे वाटप करण्यात आलेले असुन वारसान नोदीचे अद्यावतीकरुन सिरोंचा या गावातील तिन लाभार्थ्याना सुधारीत 7/12 वाटप करण्यात आले, विवाह नोदणी प्रमाणपत्र दोन (२) मतदार ओळखपत्र (स्मार्ट कार्ड ) -4 , केशरी शिधापत्रीका तिन (३) प्रतिज्ञापत्र – 2 (दोन) ,स्थानिक रहिवाशी दाखले-1 (एक) दिव्यांग प्रमाणपत्र – 2 (दोन) इत्यादी लाभ लाभार्थाना कार्यक्रम स्थळी वितरण करण्यात आले. तसेच मा. श्री जितेंन्द्र शिकतोडे, तहसिलदार सिरोंचा यांनी त्यांचे अध्यक्षीय भाषनामध्ये शासनाकडुन दिनांक दिनांक17 सप्टेंबर 2022 ते 2 आक्टोंबर 2022 या कालावधीत “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा ” आयोजीत करण्यात आलेला असुन त्याचा लाभ तालुक्यातील सर्व जनतेने घ्यावा या बाबतचे आवाहन तालुक्यातील सर्व जनतेस करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन श्री पुप्पलवार नायब तहसिलदार सिरोंचा यांनी करुन उपस्थितांचे तसेच लाभार्थाचे आभार श्री सय्य्द, नायब तहसिलदार सिरोंचा यांनी मानुण कार्यक्रम संपल्याचे जाहिर करण्यात आले.