रायगड दि. सामाजिक जीवनात वावरताना महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते. बहुतांश वेळा महिला ह्या अधिकार आणि जनजागृती बाबत सजग नसल्याने महिलांना त्यांच्या न्यायोचित अधिकारापासून डावलेले जाते परिणामी महिला या अन्यायाला बळी पडत असताना त्यामुळे संविधानाने दिलेल्या कायद्याच्या अधिकाराचे अंमलबजावणी करून त्या माध्यमातून उच्च मानवी मूल्यांचा मळा आपल्या जीवनात फुलवावा त्याकरिता महिलांनी स्वतःचे संरक्षण आणि कल्याण संविधान आणि कायद्याचा आधार घेऊन करावे असे प्रतिपादन बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी केले
बहुजन जनता दल महिला आघाडी आयोजित बहुजन जनता दल महिला आघाडी शाखा माणगाव नाम फलकाचे उद्घाटन बहुजन जनता दलाचे संस्थापक ,अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आलेल्या कार्यक्रमा वेळी ते बोलत होते
सदर कार्यक्रमाचे आयोजन बहुजन जनता दल महिला आघाडी शाखा अध्यक्ष सौ शोभाताई भगत यांनी केले तर या कार्यक्रमाला बहुजन जनता दल रायगड जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अश्विनीताई गालफाडे आशाताई पिंपळेकर माणगाव शहराध्यक्ष सौ लताताई देवरे कोकण विभागीय अध्यक्ष कुसुम माळवेकर महाड शहराध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवर महिला उपस्थितीत होत्या, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ संगीता काळे यांनी केले तर सुत्रसंचलन सौ छाया कानकिरड यांनी केले व आभार प्रदर्शन शोभाताई भगत यांनी केले यावेळी, ज्योती कराटे मंगला वाकोडे सुप्रिया काळबांडे संगीता राजूरकर रुक्मिणीबाई गावंडे सरस्वती बरगडे रंजना जाधव शीलाताई चांदणे मंगला परदेशी अलका आठवले मनीषा कांबळे संगीता जावे कर नंदिनी घुमरे सुरेखा ठाकरे यांच्यासह अनेक बहुजन जनता दल महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते