पुणे दि. शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर आधारित असलेल्या बहुजन जनता दल गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक धार्मिक व राजकीय कार्य आणि वाटचाल करीत आहे बहुजन जनता दलाच्या या सर्व कार्याची व वाटचालीची दखल लंडनच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि जागतिक कीर्तीच्या इंटिरियर डेकोरेट व्यवसाय इंजीनियर असलेल्या तालिया जेड यांनी इंटरनेट आणि फेसबुकच्या माध्यमातून माहिती घेऊन घेतली आहे असे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी सांगितले आहे
बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्यासोबत लंडन येथील सामाजिक कार्यकर्त्या तालिया जेड यांनी दूरध्वनी द्वारे संपर्क करून बहुजन जनता दलाच्या महाराष्ट्राच्या वाटचालीसंबंधी आणि कार्याची दखल घेऊन बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यासाठी ह्या मंगळवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२२ रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत असेही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी सांगितले आहे
लंडनच्या सामाजिक कार्यकर्त्या तालिया जेड यांचे मंगळवार रोजी पुणे येथील एअरपोर्टवर बहुजन जनता दलाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे तालिया जेड ह्या बहुजन जनता दलाच्या पुणे येथील मध्यवर्ती केंद्रीय कार्यालया भेट देऊन बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांची भेट घेऊन
त्यांच्यासोबत बहुजन जनता दलाच्या कार्याबद्दल आणि वाटचाली बद्दल सविस्तर चर्चा करून माहिती घेणार आहे तेव्हा बहुजन जनता दलाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मंगळवार दि.२२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता बहुजन जनता दलाच्या मध्यवर्ती केंद्रीय कार्यालय येथे उपस्थितीत राहावे असे आव्हान बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी केले आहे