अकोला.... माय मराठी साहित्य प्रतिष्ठान अकोला व तरुणाई फाउंडेशन कुटासा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार प्रतिभेचा सन्मान कवीचा या सत्कार समारंभाचे आयोजन रविवार रोजी दुपारी ४ वाजता मराठा सेवा संघ कार्यालय जुन्या आरटीओ ऑफिस येथे करण्यात् आले होते अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यातील प्रतिभावंत साहित्यिकांचे साहित्य यावर्षी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत बी. ए .बी कॉम या अभ्यासक्रमात लागले असून त्यात किशोर बळी विजय दळवी अजय खडसे मिरा ठाकरे वैभव भिवरकर प्रा डॉ अशोक आर इंगळे रवींद्र महले शाम ठक गजानन मते संजय महल्ले आदी साहित्यिक बधवाचा सत्कार शाल गौरव पत्र देऊन मान्यवराच्या शुभ हस्तेकरण्यात आला आयोजन करणे हे साहित्यिक संस्थेचे कर्तव्य म्हणून या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळशीराम बोबडे, स्वागत अध्यक्ष उमेश मसने तर प्रमुख अतिथी म्हणून पुष्पराज गावंडे , लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, संजय मा देशमुख,माया ईरतकर, प्रा देवानद गावंडे मा नगरसेवक प्रशांत भारसाकडे तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप देशमुख आदिची प्रमुख उपस्थिती होती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात यंदा प्रथमच शेती मातीच्या कवितांचा समावेश झालेला असून बहुजन कवींना जास्तीत जास्त प्रमाणात संधी देण्यात आली आहे असे मत तुळशीराम बोबडे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव लुले प्रास्ताविक संदीप देशमुख तर आभार सागर लोडम यांनी मानले.