कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) श्री संत गजानन महाराज हॅण्डबॉल क्लब,कारंजा(लाड),जिल्हा वाशिम तथा दि हॅण्डबॉल असो ऑफ वाशिम डिस्ट्रिक्ट,वाशिमची आदर्श खेळाडू तथा अंबादास पचगाडे विज्ञान विद्यालय उंबर्डा बाजारची आदर्श विध्यार्थीनी कु.साक्षी दत्तात्रय माटोडेची दिल्ली येथे दिनांक ०६ ते १२ जून २०२३ रोजी संपन्न होणाऱ्या ६६ वी ज्युनिअर शालेय राष्ट्रीय हॅण्डबॉल अजिंक्यपद स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात निवड करण्यात आली आहे.
कु साक्षी माटोडे ही नियमितपणे हॅण्डबॉल या खेळाचा सराव श्री संत गजानन महाराज हॅण्डबॉल क्लब,तालुका क्रीडा संकुल कारंजाच्या भव्य मैदानावर करत असते.साक्षीची ही दूसरी राष्ट्रीय स्पर्धा असून श्री संत गजानन महाराज हॅण्डबॉल क्लबच्या शिरपेचात तिने मानाचा तुरा रोवला आहे.उपरोक्त स्पर्धेकरीता निवड चाचणी स्पर्धा दिनांक २९ मे ते ३० मे २०२३ला विभागीय क्रीडा संकुल नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती.सदर निवड चाचणीस्पर्धेत साक्षीने उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केल्यामुळे निवड समिती सदस्य राजेश गार्डे,उज्वला लांडगे, व चारुशीला मॅडम यांनी तिची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड केली. साक्षी आपल्या यशाचे श्रेय आई वडील, प्रशिक्षक दर्शन रोकडे, क्लबचे सचिव राहुल गावंडे यांना देत असून जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता ठोसरे
मॅडम,असोसिएशनचे अध्यक्ष देवेंद्र पाटील ताथोड, उपाध्यक्ष गोपाल पाटील भोयर ,विजय पाटील काळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे,बालाजी शिर्शिकर,प्रा.सुभाष गावंडे, वसंतराव साबळे, राजू मते,राजेश अढावू,भरत हरसुले,प्रा.शशिकांत नांदगावकर,शारीरिक शिक्षक विवेक गहाणकरी, पत्रकार संजय कडोळे,श्रीहरी कॉम्पुटरचे संचालक योगेश भोयर,माजी नगरसेविका सौ प्राजक्ता उमाकांत महितकर,दिनेश पळसकर,सदानंद राऊत, सुनील सुडके, संतोष धोटे,विपीन शेंडेकर,उमाकांत माहीतकर,राम धर्माधिकारी,राजेश शेंडेकर, मुख्याध्यापक विजय भड , प्रज्वल उजवणे,अभिषेक काळे यांनी साक्षीचे कौतुक करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्यात.
आपल्या प्रतिक्रिया द्या....