कारंजा(लाड) : आध्यात्म्य व सत्संगाच्या प्रचार प्रसारा करीता,चैत्र नवरात्रोत्सवा निमित्त स्थानिक जयभवानी जय मल्हार वारकरी मंडळ आणि संत नामदेव तुकाराम वारकरी मंडळाच्या सांस्कृतिक विभागाचे कारंजेकर वारकरी यांनी डॉ ज्ञानेश्वर गरड यांच्या आर्थिक सहाय्याने श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील विदर्भ रुक्मिणी शक्तिपिठ आणि जहाँगीरपूर येथील जागृत श्री हनुमान मंदिराची वारी पूर्ण केली. या वारीमध्ये अनुक्रमे डॉ ज्ञानेश्वर गरड, रामदास कांबळे,प्रदिप वानखडे आणि आयोजक दिंडी प्रमुख संजय कडोळे यांनी मांडवा जि. वर्धा येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ व मांडवावासीयांद्वारे, परमपूज्य गुरुमाऊली महंत साध्वी श्री विजयादेवी यांच्या रामकथेला उपस्थिती लावली यावेळी मांडवावासीयांनी कारंजेकरांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. त्यानंतर कौंडण्यपूर येथील आदिशक्ती श्री रुक्मिनी मातेच्या मंदिरातील श्री विठ्ठलरुक्मीणी यांची कुळदैवत असलेल्या आद्यशक्ती अंबाबाईचे त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेऊन त्यांनी विदर्भ श्री रुक्मिनीपिठाचे अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामनंदाचार्य स्वामी श्री रामराजेश्वराचार्यजी समर्थ माऊली सरकार यांचे आश्रमात भेट दिली. यावेळी कारंजेकर डॉ ज्ञानेश्वर गरड, रामदास कांबळे, उमेश अनासाने, प्रदिप वानखडे, संजय कडोळे यांचे आश्रमाचे व्यवस्थापक उमेश जवेरी यांनी स्वागत केले.आणि आश्रमाच्या कन्यापूजन,आरोग्य शिबीर व सेवाभावी उपक्रमाबाबत अवगत केले. कौंडण्यपूरचा निरोप घेऊन कारंजेकर वारकरी मंडळीनी जहाँगीरपूर येथील प्राचिन, श्री हनुमान मंदिराला भेट दिली. तेथील पुरोहितांनी सांगीतले की, द्वारकायुगामध्ये श्री रुक्मिणीहरणाचे वेळी श्री हनुमान हे द्वारकाधिश श्रीकृष्णाचे म्हणजे पांडूरंगाचे दूत म्हणून या क्षेत्रा आल्याची व माता रुक्मिणीचे आज्ञेवरून याच क्षेत्री राहील्याची माहीती दिली. तसेच साडे चारशे वर्षापूर्वी येथील रहिवाशांना शेतामध्ये ही हनुमानमूर्ती मिळाल्याची माहिती दिली. तसेच जहॉगीरपूर क्षेत्रीच्या ह्या हनुमानजींनी सिने अभिनेत्री हेमामालिनी यांच्या स्वप्नात दर्शन दिल्याने हेमामालिनी यांनी येथे येऊन प्रत्यक्ष दर्शन घेतले . व येथील जिर्णोध्दार व जहाँगीरपूरच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण करून दिल्याची माहिती दिली . शिवाय मनोजकुमार यांनी सुद्धा येथे भेट दिल्याचे सांगीतले . अतिशय जागृत देवस्थान असल्याने संपूर्ण भारतामधून येथे श्रीरामभक्तांची गर्दी होत असते. असे वृत्त त्यांनी आमच्या प्रतिनिधीला दिले आहे.