नागभिड----शहरात आज इस्लामी कैलेंडर प्रमाणे मोहर्रम चा १० तारीख ही इमाम हुसैन यांचा हौतत्म दिन म्हणून त्यांचा स्मृती प्रित्थर्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
इस्लाम धर्माचे प्रवर्तक मोहम्मद पैगंबर यांचे नातू इमाम हुसैन यानी धर्म रक्षणार्थ करबला येथे आपल्या ७२ अनूयायी व कौटूंबिक सदस्यासह अधर्माला शरण जाण्यापेक्षा धर्मरक्षणार्थ हौतात्म पत्करणे स्विकारले होते त्यांचा या बलीदानाची )आठवन म्हणून आज सकाळी येथील येथील जामा मस्जिद येथे कूरान पठन तसेच त्यांचा करबला येथील बलीदानाचा प्रसंग प्रवचना द्वारे सांगण्यात आला तसेच येथील मस्जिद चौकात व शहरातील बाजार पेठेत मुस्लिम युवक मंडळीकडून मूख्य रस्त्यावर वाटसरूना खिचड़ीचा व शरबत चे वितरण करण्यात आले याप्रसंगी सिराज अहि जादा , ईलास बकाली, रफि शेख, अफसर शेख, आतिफ पटेल, मुजर पठान, परवेश साबरी, मदनी जादा,शब्बीर जादा, मुजाहिदीन शेख,सिकंदर शेख,आणी मस्जिद कमेटी चे सवॅ सदस्य तसेच मोठ्या संख्येत मुस्लिम बांधव उपस्थित होते