तुमच्या अधिकारात,राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रकाकडून,मंगरुळपिरहून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या कारंजा डेपोमधून वळवा. ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांची आग्रही मागणी.
कारंजा (लाड) : कर्तव्यतत्पर महिला आमदार माईसाहेब डहाके आपण राज्य परिवहन महामंडळ अकोल्याच्या विभागीय नियंत्रकांसोबतची बैठक घेऊन कारंजेवर प्रवाशांची, त्यांच्या साठी आवश्यक बसगाड्यांची अडचण सोडवावी.आणि हल्ली मंगरूळपिर डेपोमधून जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या बसगाड्या कारंजा डेपो पासून सुरु कराव्या. अशी कळकळीची मागणी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवी ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी केली आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, कारंजा नगरीतील स्व. प्रकाशदादा डहाके सभागृह शेतकरी निवास कारंजा येथे दि. २१ मे २०२५ रोजी झालेल्या तालुकास्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर म्हणजेच "माईसाहेबांच्या जनता दरबारात" कारंजा येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे आणि युवा पत्रकार समिर देशपांडे तथा अमोल अघम यांनी आजूबाजूच्या चारही जिल्ह्यांतून, अकोला अमरावती यवतमाळ वाशीम येथून आणि उपराजधानी नागपूर येथून रात्री ०९:०० वाजता कारंजा येथे परत येण्यासाठी शेवटची बस नसल्याची खंत व्यक्त करून आमदार माईसाहेब डहाके यांना बसगाड्या सुरु करण्याबाबत निवेदन दिले होते.परंतु अद्यापर्यंत राज्य परिवहन महामंडळ कारंजा कडून त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. कारंजा हे शहर ऐतिहासिक धार्मिक तिर्थक्षेत्र पर्यटनाचे शहर असून व्यापारी शहर म्हणूनही ओळखल्या जाते.त्यामुळे या शहरातून आजूबाजूच्या जिल्ह्यात दररोज येणेजाणे करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे.त्यामुळे या शहरातून आवागमन करण्यासाठी वेळापत्रकामध्ये भरपूर बसगाड्याची संख्या अत्यावश्यक आहे.तसेच वाशिम, अकोला,अमरावती,यवतमाळ आणि उपराजधानी नागपूर येथून कारंजाकरीता परत येण्यासाठी रात्री ०९:०० वाजता अखेरची बस सुरू करणे अत्यावश्यक व महत्वाचे आहे.तसेच कारंजा शहरापासून अवघ्या अर्ध्या तासाच्या व केवळ अठ्ठावीस किलो मिटरच्या अंतरावरून लांब पल्ल्यांच्या जसे की, "मंगरूळपिर ते पंढरपूर" ; "मंगरूळपिर ते शिर्डी", मंगरुळपिर ते भिवंडी" इत्यादी गाड्याची ये-जा सुरु असते. त्यामुळे ह्या लांबपल्ल्याच्या सर्व बसगाड्या कारंजा डेपोमधून सुरु कराव्यात. व कारंजामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अडचण सोडवी अशी मागणी पुढे येत आहे. व त्यासाठी आमदार माईसाहेब डहाके यांनी विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अकोला यांचेशी बैठक घेऊन त्यांचे मार्फत कारंजेकर प्रवाशांचे बसगाड्याच्या लांब पल्ल्याच्या फेऱ्याचे प्रश्न सोडविण्याची कळकळीची मागणी ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी आमदार माईसाहेब डहाके यांचेकडे लावून धरली आहे.