वाशिम (पत्रकार संजय कडोळे कडून) : जवाहर नवोदय विद्यालय पुर्व प्रवेश परीक्षा इयत्ता 11 वी करीता 22 जुलै 2023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय,काटा रोड,वाशिम येथे होणार आहे.या परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने काढण्यास सुरुवात झाली आहे. हे प्रवेशपत्र https://cbseitms.nic.in/2023/jnvxi या संकेतस्थळावरुन रजिस्ट्रेशन क्रमांक व विद्यार्थ्यांची जन्म तारीख टाकून काढता येईल. तरी सर्व पालक,विद्यार्थी व शिक्षकांनी परीक्षेचे प्रवेशपत्र तातडीने ऑनलाईन डाऊनलोड करुन घ्यावे. असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.डी. खरात यांनी कळविले आहे.