रविवारी सकाळी आठच्या सुमारास राजेगावच्या पुढे बालाघाट रस्त्यावर घिसरी नदीजवळ भरधाव कार झाडावर आदळल्याने त्यात बसलेल्या एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. ज्यामध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे. मध्यप्रदेशातील बैहर येथील कुमादेही येथे आयुर्वेदिक उपचारासाठी जात असताना ही घटना घडली. त्यामुळे बडोले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथून आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी कारमधून जिल्ह्यातील बैहार भागातील कुमदेही येथे येत होते. कारमध्ये ब्रम्हपुरी रहिवासी असलेल्या कुटुंबातील सदस्यांपैकी सासरे 65 वर्षीय विजय यांचा मुलगा गणपत बडोले कार चालवत होते. ब्रम्हपुरी येथील श्रीनगर कॉलनीतील रहिवाशी सेवानिवृत्त बस चालक विजय गणपत बडोले कुटुंबीयासह रविवार १६ एप्रिल रोजी स्वतःच्या चार चाकी वाहनाने मध्यप्रदेशातील बैहर येथील कुमादेही येथे जात असताना किरणापूर नजिक नेवरागाव कला येथे एका दुचाकी वाहनास वाचविण्याच्या प्रयत्नात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की झालेल्या भीषण अपघातात वाहकचालक विजय गणपत बडोले (५८) हे गंभीर जखमी झाले. तर त्यांची पत्नी कुंदा बडोले (५२) मुलगा गिरीश बडोले (३२) व विवाहित मुलगी मोनाली चौधरी (बडोले) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर वाहन चालक सेवानिवृत्त विजय बडोले, सून बबिता बडोले आणि दोन लहान चिमुकले नातवंड गंभीर जखमी झाले.
ही घटना इतकी भीषण होती की झाडावर आदळताच कारचा चक्काचूर झाला. मृत व जखमींना रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. जिथे जखमींवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, रुग्णालय चौकी पोलिसांनी मृतांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. जखमी बबिता बडोले यांनी सांगितले की, बैहारमधील कुमदेही येथे आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी येत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण सुटले आणि झाडावर आदळली.