चंद्रपूर, दि. 11 : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी (PM-NAM) योजनेअंतर्गत क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), गडचिरोली येथे 14 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता उमेदवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याचे उद्दिष्ट आयटीआय पास, शिकत असलेले व माजी विद्यार्थी यांना स्थानीय व नामांकित उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आहे. लॉईड मेटल्स यांच्यासह अनेक नामवंत कंपन्यांचे प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
PM-NAM योजना ही केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत राबवली जाणारी महत्वाकांक्षी योजना असून, शिकाऊ उमेदवारीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव मिळतो. यामुळे केवळ रोजगारच नव्हे तर स्वयंरोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतात.
या मेळाव्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक प्रशिक्षण सल्लागार प्रणाली दहाटे (बीटीआरआय, चंद्रपूर) व संस्थेचे प्राचार्य श्री. चौधरी यांनी केले आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार कंपनीकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. मेळाव्याचे आयोजन शासकीय आयटीआय गडचिरोली आणि बीटीआरआय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. बावनकर, गट निदेशक, शास. आयटीआय, गडचिरोली आणि योगेश धवणे, बीटीआरआय, आयटीआय चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधावा.
0000000
आपल्या प्रतिक्रिया द्या....