गडचिरोलीमधून मोठी बातमी समोर येत आहे. पोलिसांकडून नक्षलवाद्यांचं विशेष शिबीर उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. घातपाताच्या तयारीत असलेल्या नक्षलवाद्यांच्या या लोकेशनची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर गडचिरोली पोलीस आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली. घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गडचिरोली पोलीस आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त पथकानं नक्षलवाद्यांचं विशेष शिबीर उद्ध्वस्त केलं आहे. गडचिरोली आणि छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या दमूर बारेगुडा या भागात नक्षलवाद्यांनी हे शिबीर आयोजित केलं होतं. या शिबीराला जवळपास 25 पेक्षा अधिक जहाल नक्षलवादी उपस्थित होते.घातपाताच्या तयारीत असलेल्या नक्षलवाद्यांच्या या लोकेशनची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईमध्ये नक्षलवाद्यांचं हे शिबीर उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला, पोलिसांकडूनही गोळीबार करण्यात आला. त्यानंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या कारवाईमध्ये मोठा शस्त्रसाठा आणि नक्षली साहित्य जप्त करण्यात आलं आहे.