दुचाकीची कारला जब्बर धडक दिल्यानं दुचाकी चालक गंभिर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की मिळालेल्या माहितीनुसार MH -33 - V- 3328 ही कार आरमोरी वरून वैरागडकडे जात असताना MH- 40- BX- 4019 मागेहून येत असलेल्या दोघेस्वार दुचाकी पल्सरने मागेहून कारला जब्बर धडक दिल्याची सदर घटना अंदाजे 12 ते 1 वाजताच्या दरम्यान घडली.
मागेहून कारला धडक मारल्याने दुचाकीचालक रस्त्याच्या कडेला असलेल्या खाईमध्ये पडल्याने त्या दुचाकीस्वाराचा डोक्याला गंभीर जखमी झाला व लगेच आरमोरी येथिल रुग्णालयात उपचारा करिता नेण्यात आले आहे.तर त्या पल्सरवर दुचाकी स्वार सुखरूप आहे. सदर कारचालक हा वडेगाव येथील रहिवासी आहे. तर दुचाकी पल्सर चालक हा आरमोरी येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक माहिती मिळालेली आहे.
या घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी करीत आहे.