वरोरा :- वरोरा चिमूर मार्गावर शेगाव ( बु ) जवळ रोडवर अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकांवर केलेल्या कारवाईत तहसील कार्यालय परिसरात जप्त केलेले ते ट्रक अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास पळवून नेले त्यामुळे तहसीलदार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दि. 22 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला.
दि. 22 जानेवारी रोजी रात्रीला साडेबारा वाजता च्या दरम्यान परिसरातील अवैध उत्खनन वाहतूक याचा शोध घेण्याकरिता चिमूर ते वरोरा मार्गावर उल्हास लोखंडे, वय 57 वर्ष नायब तहसीलदार तहसील कार्यालय वरोरा चिमूर रोडने जात असताना रात्रीच्या सुमारास शेगाव (बु) रोडवर दोन ट्रक MH 40 CT 1804 व MH 27 BX 4700 क्रमांकाच्या ट्रकमध्ये अवैध रेती असल्याची शंका आल्याने ट्रकचालक शेख रशीद शेख हबीब व कलीन दुर्गलीन शेख हनिफ यांना ट्रक थांबवीत परवाना बाबत विचारणा केली असता त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे दिसून आल्याने सदर दोन्ही ट्रकवर नायब तहसीलदार यांनी या अवैध रेती ट्रकांवर कारवाई करण्यासाठी शेगाव पोलीस स्टेशन कर्मचारी यांना घेतं कारवाई केली. दोन्ही ट्रके रात्रीला अडीच वाजताच्या सुमारास वरोरा तहसील कार्यालय येथे आणण्यात आले, त्या ट्रकच्या चाब्या ही जप्त करण्यात आल्या त्यानंतर शेगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यांना शेगाव पोलीस ठाण्यात सोडून देण्याकरिता गेले असता. सकाळी ४:४७ मिनिटांनी परत तहसील कार्यालय गाठून बघतात तर तहसील कार्यालय परिसरातील दोन्ही ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसून आले. त्यामुळे तहसीलदार योगेश कौटकर यांच्या आदेशानुसार वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. त्यात जप्तीनामा केलेले वाहन मध्ये 24 ब्रास रेती याची किंमत 3,74,400, दोन्ही ट्रकांची किंमत 60 लाख असा एकूण 1 कोटी 23 लाख 74 हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळून नेला. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 ( 2 ) नुसार गुन्हा दाखल केला असून या अग्यात आरोपीचा शोध डी.बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दिपक ठाकरे व त्यांची चमू घेत आहे.
चौकट-
तहसील विभागात देखरेखे करिता CCTV कॅमेरे लावलेले आहे. या कॅमेरा द्वारे तहसील कार्यालयात एका चार चाकी वाहनातून तीन ते चार इसम आल्याची माहिती आहे. आता या चार आरोपींना पकडण्यास पोलिसांना यश येते का असा प्रश्न नागरिक करीत आहे.