आमचे मित्र,एक प्रथितयश गायक,स्व.लता मंगेशकरांचे अनुयायी, शुध्द जल पुरवठ्याच्या मानवसेवेत दक्ष असणारे पाणी पुरवठा कंत्राटदार श्री.राजीव देशमुख यांचा ६१ वा...... आणि ईस्त्रो मध्ये दाखल झालेली त्यांची अंतराळ संशोधक कन्या कु.शिवानी हिचा २५ वा जन्मदिन काल आर्वी जि.वर्धा येथे साजरा करण्यात आला.
आयुष्याच्या ६१ वर्षातील प्रगतीपथावर सहकार्याचा आधार देणाऱ्या मित्रांनाही या "जीवनमित्र"कार्यक्रमात कृतज्ञता म्हणून राजीवजींनी स्मृतिचिन्ह,शाल,श्रीफळ,बुके देऊन सन्मानित केले.यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून कु.शिवानीला सन्मानपत्र,पुस्तक व शाल.... तर तिचे वडील राजीवजी यांना शाल व ग्रामगीता देऊन सन्मानित करण्यात आले.शिवानीचे अभिनंदन करून दोघांनाही जन्मदिन अभिष्टचिंतनासोबतच शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्यात