पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक,शाखा मंगरूळपीरचे जवानांची साहसी कामगीरी
कारंजा (जिल्हा प्रतिनिधि संजय कडोळे) अपघाताच्या प्राप्त माहितीनुसार 20 ऑगस्टच्या रात्री अंदाजे 11:00 वाजताच्या दरम्यान कारंजा ते मंगरूळपीर हायवेला लागुनच असलेल्या कारंजा लगतच्या शेलुवाडा पुलावरुन झालेल्या अपघातात कारंजा येथील ॲपे चालकासह एकूण दोन
व्यक्ती धरणात फेकल्या गेले. यापैकी एकजण रात्रीच कसाबसा पोहत बाहेर आला,पण एकजण बुडाला. बुडालेल्या व्यक्तीला शोधण्यासाठी तात्काळ कारंजा ग्रामीण पोलिसांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ रेस्क्यु ऑपरेशन करिता पाचारण केले क्षणाचाही विलंब न करता मंगरूळपीर शाखेचे सहकारी अतुल उमाळे, गोपाल गीरे, लखन खोडे, दत्तात्रय मानेकर,प्रदिप बुधे,यांना आज सकाळी 5:30 वाजता घटनास्थळी पाठवीले आणी कारंजा ग्रामीण पो.स्टे.चे ठाणेदार आणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांचे आदेशाने तात्काळ सर्च ऑपरेशन चालु केले असता, आज सकाळी 8:30 वाजता धरणातील मृतदेह शोधून बाहेर काढला.
मृतक हे ॲटो चालक अलीमोदीन काजी रा.कारंजा (लाड) वय अंदाजे (38) वर्ष आणी अपघातील वाचलेले जखमी वसिम खान वय अंदाजे (36) वर्ष रा.कारंजा (लाड) हे असल्याचे निष्पन्न झाले.
यावेळी कारंजा उपविभागीय आधी8 ललितकुमार व-हाडे, तहसीलदार कुणाल झाल्टे,कारंजा ग्रामीण पो.स्टे.चे पि. आय. कदम आणि पोलीस कर्मचारी हजर होते.अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दिली आहे.