कारंजा (लाड) : पर्यावरणातील बदलामुळे,ऐन हिवाळ्यात गेल्या दोन दिवसा पासून सुरु असलेल्या धुवाँधार अशा अवकाळी पाऊसाने हवेत प्रचंड गारवा निर्माण झालेला असून,तिव्रतेने वेगवान थंडगार वारे वाहत आहेत.त्यामुळे या वातावरणाचा मानवी शरीरावर आणि आरोग्यावर प्रचंड परिणाम होतो आहे. हवामानातील सदरच्या या बदलामुळे आपल्या कुटुंबातील वयोवृद्ध,गरोदर व बाळंतीन स्त्रीया,लहानमुले यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे नागरीकांनी घरातील म्हाताऱ्या व्यक्ती,गरोदर स्त्रीया,बाळ बाळंतीन व लहान मुलांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष्य द्यावे.अशा हवामान बदलात विशेषतः सर्दि,खोकला,ताप, हिवताप,अतिसार वगैरे आजाराची प्राथमिक लक्षणं जाणवतात.अशी लक्षणे जाणवल्यास नागरीकांनी त्वरीत जवळच्या क्लिनिक किंवा रुग्नालयाशी संपर्क साधून आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार सुरु करावा.हवामानातील गारवा लक्षात घेऊन स्वेटर,मफलर, ऊलनचे गरम कपडे वापरावे. पिण्याकरीता कोमट पाणी वापरावे. अद्रक, सुंठमिरे, तुळशी अर्क टाकून काढा घ्यावा.शेकोटीवर ऊब घ्यावी. व आपले आरोग्य सांभाळावे असे आवाहन कारंजा येथील समर हॉस्पिटल,महात्मा फुले चौक कारंजाचे वैद्यकीय अधिकारी डॉ . मुजफ्फर खान यांनी नागरिकांकरीता केले आहे. असे वृत्त आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवीले.