Lवाशिम : सुसाट वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पूर्व मोसमी पावसाने संपूर्ण विदर्भात थैमान मांडलेले असून,या बेमोसमी पावसामुळे आंबा,संत्रा,लिंबू, फुलझाडे व पालेभाज्यांचे अतोनात नुकसान होत असल्याचे बागायतदार शेतकऱ्यांनी सांगीतले आहे. शिवाय लगीनसराई असल्यामुळे लग्नघरी चांगलीच पंचाईत होत आहे.चालू आठवडयात भाग बदलून कमिजास्त किंवा रिमझिम पाऊस सुरुच आहे.या वातावरणामुळे नागरिकांना विजेच्या लपंडावालाही तोंड द्यावे लागत आहे. ठिकठिकाणी रात्र रात्रभर विजपुरवठा खंडीत होत आहे. वाशिम जिल्हयातील अनेक बाजारपेठामध्ये शेतकऱ्याच्या विक्रीसाठी आलेल्या मालाला ठेवायला देखील शेड नाहीत.हे मागील आठवडयात झालेल्या मानोरा बाजारपेठेतील घटनेतून सिद्ध झाले आहे.त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्याच्या मालाची धुळधाण होणार नाही.याची काळजी घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मंगळवार दि. २० मे २०२५ रोजी सायंकाळी जिल्ह्यात तसेच कारंजा मानोरा तालुक्यात सर्वदूर रिमझिम ते कमिजास्त पाऊस झाल्याचे वृत्त ठिकठिकाणाहून प्राप्त झाल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.तसेच दि. २५ मे २०२५ पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता असून, राज्यासह विदर्भात काही ठिकाणी वादळी वारे सुसाट वाहून विजा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचे वातावरण दिसताच दुपारनंतर आपल्या शेळ्यामेंढ्या, गुराढोरांसह गावाकडे परतावे. विजा पडणार असल्याने चुकूनही शेतात किंवा हिरव्या झाडाच्या आश्रयाने थांबू नये.आपले मोबाईल म्हणजेच भ्रमणध्वनी बंद करून ठेवावे. विजा कडाडत असतांना ट्रॅक्टरवर बसू नये. अचानक जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास नदी नाल्याला पूर आल्यास नदी नाले ओलांडून जाण्याचा, पुरात गुरेढोरे किंवा वाहने,एस टी बस,दुचाकी टाकण्याचा प्रयत्न करू नये.असे आवाहन करंजमहात्म्य परिवाराकडून करण्यात येत असल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.