नागभिड: नागभिड वनपरिक्षेत्रातील जनकापूर येथे गेले अनेक दिवसापासून बिबट्या चा धुमाकुड सुरू असुन. अनेक शेतकऱ्याच्या शेळ्या-बकऱ्या फस्त करीत असतांनाच आज रात्रो दयाराम गुरूनुले यांचे मालकिचे तिन शेळ्या रात्रो गोठ्यात ठार करून बिबट्या जंगलात पसार झाला. तर काही अतंरावर पुन्हा कृष्णाजी काशिवार यांचे आवारात घुसून त्याचा पाळिव कुत्र्यावर हल्ला करून ठार केले व जगंलात घेवून पसार झाला.सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत ग्रामीण भागांतील अनेक कुटुबातील व्यक्ती बाहेर अंगणात झोपतात. अशातच जर सदर बिबट्या ने मनुष्यावर हल्ला केला तर जिवित हानी नाकारता येत नाही. तेव्हा या बिबट्याचे त्वरीत बंदोबस्त करावे. असी मागणी माजी उपसरपंच सचिन मसराम, माजी ग्र.प.सदस्य राहुल रामटेके, प्रतिष्टीत नागरीक कृष्णाजी काशीवार,तमुस अध्यक्ष गिरिधर बोरकर, सागर काशीवार यांनी केली आहे.अनेक दिवसापासुन शेतकऱ्याच्या पाळीव प्रण्याना बिबट्या ने भक्ष बनविल्याने शेतकऱ्यावर सकंट कोसळले आहे.घटनेची माहिती वनरक्षक जी.एम नवघडे यांना मिळतात घटना स्थळी भेट देवून पंचनाम केला. असुन जनतेनी सावध राहावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले.