कारंजा : कारंजा तालुक्यातील ग्रामिण भागातील शेत जमिनीचे अतिवृष्टी पावसामुळे भयंकर नुकसान झालेले असून शेतकर्याच्या सोयाबीन, तुर, कपाशीची पिके मोठया प्रमाणात हातची गेल्यामुळे जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा प्रचंड हवालदिल झालेला असून, शेतकर्याचा नांगरणी, पेरणी, डवरणी सोंगण्याचा खर्च सुद्धा उत्पन्नातून वसूल होणे दुरापास्त झालेले तर कोठे कोठे तर अजूनही शेतात पाणीच पाणी साचलेले असून अख्या शेत जमिनीला तळ्याचे स्वरूप प्राप्त होऊन सोयाबिन, तुर, कपाशीचे पिके जाग्यावरच सडलेली आहेत . मात्र व्यवस्थित रित्या शेतीचे पंचनामे होत नसल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांचेकडे प्राप्त होत आहेत . तरी आता मा जिल्हाधिकारी षण्मुखराजन यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर दिवाळं निघून, कासावीस झालेल्या या शेतकर्याची दखल घेण्याची आणि आमदार राजेंद्र पाटणी यांनी आतातरी जगाच्या पोशींद्याची दखले घेऊन, ताबडतोब ओला दुष्काळ करण्याची मागणी होत आहे . अन्यथा येणार्या २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूकीत तुम्हाला सवाल केल्याशिवाय राहणार नाही अशाप्रकारची शेतकर्या मध्ये संतापाची लाट आहे .