कारची झाडाला जब्बर धडक बसल्याने दोघांचा जागीच मृत्यु झाला तर तिन जण जखमी झाल्याची घटना दिनांक:- १२/६/२०२२ ला घडली आहे.
ब्रम्हपुरी वडसा रोडवर विद्या निकेतन कॉन्व्हेंट जवळ वेगवान कार ने झाडाला जब्बर धडक दिली असता अपघातात वडसा येथील २ युवक जागीच ठार झाले असून ३ युवक गंभीर जखमी झाले आहेत. दवाखान्यात उपचार घेत आहेत.
मृतकांची नावे सन्नी संजय वाधवानी वय २४, शुभम कापगते वय २८, दोन्ही वडसा येथील स्थानिक रहिवासी आहेत. तर सुमित मोटवानी वय, २७ व इतर २ जखमींची आहेत.