"आधुनिक काळात शेतमजूर, सालगडी व घरगडी यांचेकडे शेतकर्याचे होत आहे दुर्लक्ष्य."
कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): शेती व्यवसायाला आधुनिक यंत्रणेची जोड मिळाल्याने,शहरातील शेतकर्यांकडे बैलाची संख्या कमी झालेली असून,अनेकांकडे गावचे पाटील म्हणून पोळ्याचा सन्मान असूनही त्यांचे घरी मात्र बैलजोडीच नसल्याचे वास्तव असते.परंतु तरीही हे मानकरी शेजाऱ्या-पाजार्यांकडील, बैलजोडी घेऊन,पोळ्याचे दिवशी मात्र स्वतःचीच जोडी असल्याचा आव आणत,बैल जोडीचा साज-शृंगार करून स्वतःही नविन शाही पोशाखात मिशांवर पिळ देत,बैलजोडी पोळ्यात आणत असतात.तसेच पोळा हा शेतकरी राजाचा महत्वाचा सण असल्याने,प्रत्येक शेतकरी मुलाबाळांसह नविन कपडे खरेदी करीत असतात.महत्वाचे म्हणजे पूर्वी पोळ्याला जमिनदारांचे शेतात राब राब राबणाऱ्या,शेतमजूर, सालगडी व घरगडी यांना नविन पोशाख देण्याची प्रथा होती.परंतु काळाच्या ओघात ही प्रथा लुप्त होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे काळाच्या ओघात अनेक शहरी क्षेत्रासह मोठ्या गावखेड्यातही ही पोळा भरविण्याची ही प्रथा ही लुप्त होत आहे. परंतु कारंजा या सांस्कृतिक शहराने मात्र पोळ्याची ही प्रथा आजही जपलेली असून,येथील मंगरूळ वेश,दारव्हा वेश आणि पोहा वेश या तिन ठिकाणी बैलांचा पोळा आजही भरविण्यात येत असतो.शेतकऱ्यांच्या बैलांची संख्या कमी असली तरीही काही प्रमाणात का होईना परंतु शेतकरी नगण्य बैलजोड्या पोळ्यात आणतात.व त्यानिमित्त फेरवाल्याची खेळणे फुग्याची दुकाने लागत असल्याने आणि शहरातील गावकरी पोळा पहायला गर्दी करीत असल्याने, पोळा मैदानाला यात्रेचे स्वरूप येत असल्याचे दिसून येत असते. गुरुवारी झालेल्या पोळा सणाचा सुद्धा संपूर्ण कारंजा शहरातील सर्वधर्मिय शेतकरी, अधिकारी व गावकरी मंडळीनी आनंद घेतला असल्याचे दिसून आले असून, अतिशय शांती,संयम,सद्भावना व सर्वधर्म समभाव राखीत कारंजेकरांनी पोळा हा शेतकरी राजाचा सण आनंदोत्साहात पार पडल्याचे आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळविले आहे.