कारंजा : जनजागृती सामाजिक, सांस्कृतिक, बहुउद्देशीय संस्था व भरारी स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २६ एप्रिल ते २० मे सकाळी ६ ते ८ या दरम्यान तालुका क्रीडा संकुल कारंजा लाड येथे ग्रीष्मकालीन शिबिराचे (समर कॅम्प) आयोजन करण्यात आले आहे.
मागील ८ वर्षांपासून आपल्या सेवेमध्ये अशी एकमेव अशी क्रीडा संस्था जी ग्रीष्मकालीन शिबिराचे आयोजन करत आहे.वर्ष ३ ते १६ व या गटातील मुले मुली यांना या शिबिरात प्रवेश घेता येणार आहे या शिबिरामध्ये योग प्राणायाम,विविध खेळ, मनोरंजन खेळ,भारतीय संस्कृती जपणारे खेळ तसेच चित्रकला गायन अशा स्पर्धा सुद्धा या शिबिरामध्ये होणार आहे तरी या ग्रीष्मकालीन शिबिरासाठी कारंजा शहरातील जास्तीत जास्त खेळाडूंनी आपली नोंदणी करावी अशी आवाहन भरारी स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सचिव पराग गुल्हाने यांनी केली आहे.