वाशिम : शासनाच्या विविध योजना आणि सवलतीचा, समाजातील नागरिकांना लाभ मिळावा म्हणून शासनाने "मोबाईल नंबर लिंक केलेले आधारकार्ड" अनिवार्य केले.मात्र आधार लिंक करण्यासाठी आणि जन्मतारिख जोडणी करीता,आधार केन्द्रावर जाणाऱ्या ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांचे,आधार कार्ड अद्यावत म्हणजेच अपडेट करण्यासाठी त्यांच्या "हाताच्या बोटांचे ठसेच" उमटत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले असून त्यामुळे त्यांचे आधारकार्ड अद्यावत (अपडेट) होऊ शकत नसल्याचे आधार केन्द्र संचालकाचे म्हणणे आहे.तसेच पूर्वी नविन आधार कार्ड योजना सुरु झाली त्यावेळी बहुतांश नागरिकाचे आधार कार्ड नोंदणी करतांना आधार केन्द्र संचालकांनी आधारकार्डात भयंकर चुका करून ठेवल्यात. जसे की, "नावं चुकीचे,रहिवास पत्ते चुकीचे,वय अंदाजे,जन्मतारिख अंदाजे टाकून "ध चा मा" करून आधारकार्ड वितरणाची घाई करण्यात आलेली होती. हे कटूसत्य नाकारून चालणार नाही." आज मात्र नागरिकांना "दोषपूर्ण (चुका असलेल्या) आधारकार्शाडमुळे "सकीय योजना व सवलती पासून वंचित रहावे लागत आहे.महत्वाचे म्हणजे आज रोजी 60 ते 70 किंवा 80-90 वयोगटातील व्यक्ती, त्यांचे आईवडिल पालक मजूरी निमित्ताने भटकंती करणारे असल्याने किंवा निरक्षर असल्यामुळे त्याकाळी त्यांनी त्यांच्या अपत्याच्या जन्माच्या नोंदी केलेल्या नाहीत.त्यामुळे त्यांना जन्माचे दाखले म्हणून कोतवाल बुकाच्या नोंदी मिळत नाहीत.परंतु शासनाने अशा व्यक्तीच्या आधार कार्ड मध्ये जन्मतारखेची दुरुस्ती शाळेच्या दाखल्या वरून करून घ्यायला हव्या आहेत.अन्यथा केवळ आधारकार्ड अद्यावत (अपडेट) होत नसल्याने,तळागाळातील मोलमजूरी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सोईसवलती पासून वंचितच रहावे लागणार आहे.तसेच वयोवृद्धाचे हाताच्या बोटाचे किंवा अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने त्यांना सरकारी रास्त धान्य दुकानातून धान्याचा लाभ घेता येत नाही. गॅस कंपन्यामध्ये अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने स्वयपांकाच्या गॅसचे ग्राहक म्हणून त्यांचे खाते अद्यावत होत नाही.ह्या सर्व अडचणी त्यांना येत आहेत.तरी जनतेच्या अडचणी माननिय जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी जाणून घेऊन शासनापर्यंत पोहचविल्या पाहिजेत आणि शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीवर तोडगा किंवा उपाययोजना काढली पाहिजे.अशी मागणी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केली आहे.