कारंजा:- . डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे सामाजिक न्याय व विशेष विभाग वाशिम अंतर्गत दि.२६नोव्हेबर ते ०६ डिसेंबर पर्यंत समता पर्व राबविण्यात येत असून त्याच अनुषंगाने दि.२९नोव्हेबर ला संविधान पर कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कृषी अधिकारी तथा प्रभारी विस्तार अधिकारी राठोड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक समता क्रांती आघाडीचे हंसराज शेंडे, सामाजिक समता प्रबोधन मंच चे दयावान गव्हाने तर प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य विभाग श्रीवास्तव सर आरोग्य अधिकारी जाधव मॅडम गटविकास अधिकारी परदेसी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात संविधान समितीच्या सदस्यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली त्यानंतर हंसराजजी शेंडे यांचे स्वागत सारसकर प्रशासन विभाग तसेच दयावान गव्हाणे यांचे स्वागत आहे.
तर जाधव मॅडम चे स्वागत संगीता राजगुरू यांनी केले कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक कारंजा तालुका बार्टी समतादूत प्रणिता दसरे यांनी तर आभार प्रदर्शन बार्टी समता दूत विजय डांगे यांनी केले सदर कार्यक्रमात दयावान गव्हाणे व हंसराज जी शेंडे यांनी संविधानाचे सर्व आर्टिकल समजावून सांगत कृषी व आरोग्य विभागासाठी असलेली सुविधा व कर्तव्य या विषयी माहिती सांगितली सदर कार्यक्रमाला पंचायत समिती कर्मचारी सर्वच प्रशासन विभाग कृषी विभाग आरोग्य विभाग तसेच इतर कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते . असे वृत्त बार्टी समता दूत प्रणिता दसरे यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे .