शहरातील नामांकित लोकमान्य कनिष्ठ विद्यालयातील दोन शिक्षकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थिनीला घरी बोलावून विनयभंग केल्याची घटना 26 ऑगस्ट दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास घरी बोलावत विनयभंग केल्याची घटना घडली . यासंदर्भात मुलीच्या पालकांनी काल दिनांक 29 ऑगस्ट सायंकाळी पोलिस स्टेशन वरोरा येथे तक्रार देत आरोपी धंनजय रामभाऊ पारके ,प्रमोद बालाजी बेलेकर यांच्यावर विविध कलमा अंतर्गत पास्को चा गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमान्य कनिष्ठ विद्यालय येथे शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीला दिनांक 26 ऑगस्ट रोजी प्रमोद बेलेकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त साधून विद्यार्थिनीला घरी बोलविले .या वाढदिवसासाठी शाळेतीलच शिक्षक धनजय पारके यांना बोलविण्यात आले. विद्यार्थिनीही प्रमोद बेलेकार यांच्या घरी येत वाढदिवस साजरा केल्यावर तिला वाढदिवसानिमित्त चॉकलेट देण्यात आले .शिक्षकाने या बदल्यात तुलाही गिफ्ट द्यावे लागेल अशी मागणी केली .शिक्षकाने तिला भेट म्हणून मिठी मारण्यात आली.त्यांनतर दुसरा शिक्षक तिथे हजर झाल्याने बेलेकार याने अल्पवयीन विद्यार्थिनी ला धनजय पारके यशिक्षिकाने यांनी देखील मिठी मारण्यासाठी तिचा हात पकडला व मिठी मारण्याचा प्रयत्न केला .ही घटना घडल्यावर मुलगी घरी जात झालेला प्रकार आपल्या आई वडील सांगितले .मुलीच्या आई ने यासाठी आता कुणाकडे जावे या मनस्थितीत असताना तिने एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पोलिस स्टेशन गाठत या दोन्ही शिक्षकांविरुद्ध तक्रार नोंदविली . पोलिस अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्वरित या दोन शिक्षकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 3 , 74 , 49 ,3 (5) ,पॉस्को अंतर्गत कलम 8 , 12 ,17 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नायोमी साटम, उप विभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्त्वात पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद भस्मे करीत आहे.
पिडीत मुलीच्या आई ने महाविद्यालयातील या दोन शिक्षकाने केलेल्या अत्याचाराच्या विरोधात विद्यालय समिती कडे तोंडी तक्रार दिली .त्यानुसार त्या दोन्ही शिक्षकाना महाविद्यालयात बोलविण्यात आले .या दोन्ही शिक्षकांनी पिडीत मुलगी व विद्यालय समिती च्या समक्ष माफी मागितली .शाळा समिती द्वारे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी या दोन्ही शिक्षकांना निलंबित केल्याचे सर्वांसमक्ष जाहीर केले.
देशात कोलकाता ,बदलापूर ,छत्रपती सभाजी नगर ,लातूर ,नागभिड येथे मुलीवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध तीव्र पडसाद उमटत असताना वरोरा शहरातील लोकमान्य कनिष्ठ विद्यालयात विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराचे तीव्र पडसाद उमटत आज दिनांक 30 ऑगस्ट ल माणसे पदाधिकारी राहुल खर कर , बजरंग दल प्रमुख विजय जुंनघरे ,सकल हिंदू समाजाचे कालु निर्बान असंख्य कार्यकर्त्यांसह महाविद्यालय परिसरात दाखल होत शाळा व्यवस्थापन समिती समोर निदर्शने करीत या शिक्षकांची निलंबनाची प्रक्रिया त्वरित करावी यासाठी घोषणाबाजी केली. अखेर व्यवस्थापन समितीने या दोन्ही शिक्षका विरुद्ध निलंबनाचे पत्र तयार करत त्याची प्रत पोलिस स्टेशन वरोरा येथे देण्यात आले.
मूक मोर्चा:-
काही नागरिकांनी महाविद्यालयास समोर मूक निदर्शने करीत या निंदनीय प्रकाराचा विरोध व्यक्त केला.