कारंजा (लाड)येथील,शिष्यपरिवारात असलेल्या,संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या तालुका प्रमुख संजय कडोळे यांचेसह डॉ ज्ञानेश्वर गरड,रामदास कांबळे, प्रदिप वानखडे,उमेश अनासाने यांचे मांडवा वासियां कडून स्वागत व सत्कार.

मांडवा./वर्धा : नाशिक येथील सुप्रसिद्ध असलेल्या श्री पंचमुखी हनुमान आश्रमाच्या मठाधिश असलेल्या,महंत साध्वी श्री श्री विजयादेवीजी यांच्या सुमधूर वाणी मधून,वर्धा जिल्ह्यातील रहिवाशी,मानवी समाज कल्याणाकरीता,आपल्या वेगळ्या शैलीत-विद्रोही समाज प्रबोधनाने सध्या युट्यूबवर सर्वात जास्त प्रसिद्धी मिळविणाऱ्या लोकप्रिय अशा प्रा.नितेश बाळकृष्ण कराळे गुरुजींच्या गावी,वर्धा तालुक्यातील मांडवा गावी, श्रीरामनवमी ते श्रीहनुमान जन्मोत्सवानिमित्ताने, श्रीरामकथेचे भव्य आयोजन करण्यात आले असून, सदर्हू कार्यक्रमाचे आयोजन श्री हनुमान मंदिर संस्थान मांडवा, श्री गुरुदेव सेवा मंडळ मांडवा, सर्वधर्मिय गावकरी मंडळी व उत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेले असून या कार्यक्रमाचे निमित्ताने गावकर्याचे प्रचंड ऐक्य दिसून आल्याचे प्रत्यक्षदर्शी डॉ . ज्ञानेश्वर गरड यांनी कळवीले आहे. मंगळवार दि ४ एप्रिल रोजी,व्यासपिठावरून रामकथे निमित्त किष्किंधकांड प्रस्तुत करतांना, परमपूज्य महंत साध्वी श्री श्री विजयादेवी यांनी सांगीतले की, " श्री तुलसिदास रचित श्रीरामचरितमानस ग्रंथामधून सांगीतलेले, स्नेहभावाचे सुंदर उदाहरण म्हणजे सुग्रीव-श्रीरामाची मैत्री आणि श्रीराम-हनुमंतरायाचा स्नेहभाव. अवर्णनिय आहे. मानवाने पुरुषोत्तम श्रीरामाचे चरित्र अंगीकारून, हा स्नेहभाव आपल्या प्रत्यक्ष जीवनात सदैव अंगीकारला पाहीजे.

या कार्यक्रमात मोरेश्वर यादव (फोलाणे) यांनी रामकथे मधील प्रसंगाची झाँकी, मांडवा येथील बालमंडळीद्वारे उत्तमरित्या प्रस्तुत करून श्रीरामकथेतील प्रसंग जीवंत केल्याचे दिसून येत आहेत. मुळ भिलवाडा राजस्थान येथील असलेल्या नाशीक येथील, श्री पंचमुखी हनुमान आश्रमाच्या मठाधिश परमपूज्य महंत साध्वी श्री श्री विजयादेवी ह्या राष्ट्रसंताच्या आध्यात्मिक कार्याने प्रेरीत होऊन श्री गुरुदेव सेवाश्रम गुरुकुंज मोझरीच्या प्रचार प्रसाराचे कार्य सुद्धा करीत आहेत.

त्यामुळे विदर्भात त्यांचे शेकडो शिष्यमंडळी आहेत. पैकी कारंजा (लाड) येथील साध्वी श्री श्री विजयादेवीचे अनुयायी, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे सांस्कृतिक विभागाचे तालुका प्रमुख संजय कडोळे, डॉ ज्ञानेश्वर गरड, रामदास कांबळे, प्रदिप वानखडे, उमेश अनासाने यांनी त्यांच्या किष्किंधा कांडावरील,श्रीरामकथेला उपस्थिती लावली होती. यावेळी समस्त मांडवावासी गावकरी मंडळींनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. महंत साध्वी श्री श्री विजयादेवी यांच्या आज्ञेवरून संजय कडोळे यांनी आध्यात्म्य व आपल्या कारंजा शहरातील सर्वधर्म समभावाविषयी आपले मनोगत व्यक्त केले." कारंजेकरांनी परत येतांनी श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील देवस्थाने व जहाँगीरपूर येथील श्री हनुमंतरायांचे दर्शन घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....