वाशिम / मुंबई : आज दि. 05 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्राचे 31 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री होतात,तेव्हा त्यांनी थेट इतिहास रचला आहे. मुख्यमंत्रिपदाच्या तीन कार्यकाळात त्यांनी तीन अप्रतिम विक्रम आपल्या नावावर केले आहेत.2024 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची तिसरी वेळ असून,यापूर्वी 2014 आणि 2019 मध्येही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.यावेळी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच महायुतीतील त्यांचे सहकारी असलेल्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला विक्रम
2014 च्या निवडणुकीत मोदी लाट देशभर पसरली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2014 देखील यामुळे अस्पर्श राहिली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपला प्रथमच 122 जागा मिळाल्या. त्यामुळे 31 ऑक्टोबर 2014 रोजी देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. व ते पहिल्यांवाच मुख्यमंत्री झाले .पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी 8 नोव्हेंबर 2019 पर्यंत पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला 2019 मध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दुसरा विक्रम
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकल्या आणि अविभाजित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते, पण अजित पवार यांनी पाठिंबा काढून घेतल्याने अवघ्या काही तासातच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार येवून शिवसेनेचे उध्वव ठाकरे मुख्यमंत्री झाले. अडीच वर्षानंतर शिवसेनेत उभी फुट पडल्यामुळे शिवसेनेचे दोन गट होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर शिर्षस्थ नेत्यांच्या आग्रहाखातर देवेन्द्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम नोंदवीला. त्यानंतर तिसरा विक्रम म्हणजे
2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकून आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या कोट्यातून तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली.भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीमध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या इतिहासाचा विक्रमही मोडला गेला की, आजपर्यंत एकही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री झाला नाही. कारण देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री होते. आज ते मुख्यमंत्री असून त्यांच्या मंत्रीमंडळात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि अजीत पवार उपमुख्यमंत्री असणार आहेत .