कारंजा- गत दहा वर्षापासून आदिशक्ती बहुउद्देश्यीय संस्था वाल्हई तर्फे कारंजा तालुक्यातील गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना विद्याश्री शिष्यवृत्ती अंतर्गत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. यामध्ये बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी येथील सोळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्राप्त झाले.
सदर शैक्षणिक साहित्य मध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गाची क्रमिक पुस्तके, रजिस्टर, स्कूल बॅग, वाटर बॅग, पेन, पेन्सिल इत्यादी वर्षभर पूरेल इतके साहित्य आहे.
बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी येथील कु.प्रगती गजानन ठाकरे,भावेश गणेश येवले,विष्णू गणेश इंगळे,कु.नियती संतोष घोडराव,कु. प्राची हिम्मत आडोळे, विश्वास सिद्धार्थ इंगोले, कु.श्रेया राजाराम इंगळे, ओम प्रकाश कान्हेरे, यश शंकराव मांगे, दिव्या संतोष बोनके, कु.साक्षी विनायक वानखेडे, कु.रूपाली प्रभाकर गालफाडे,कु.आचल कैलास तांबे, मंगेश लक्ष्मण इंगोले, कु.दिव्या संजय ठाकरे, प्रेम सुरेश उबाळे या सोळा विद्यार्थ्यांना विद्याश्री शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती अंतर्गत संपूर्ण वर्षभर लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची किट उपलब्ध करून देण्यात आली.
विद्याश्री शिष्यवृत्ती मध्ये यावर्डीच्या सोळा विद्यार्थ्यांचा समावेश केल्याबद्दल विद्यालयाचे शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांनी आदिशक्ती संस्थेच्या अध्यक्ष्या कविता ठाकूर,सचिव मृणाली तोमर व संचालक प्रा. निर्मलसिंह ठाकूर यांचे आभार आभार मानले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....