राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार, प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या संमती ने जयंत मोरेश्वर टेमुर्डे यांची वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र ,अध्यक्ष पदी निवड करण्यात आली,मोहबाळा ग्रा पं चे माजी सरपंच राहिलेले जयंत टेमुर्डे यांनी नागरिकांसाठी औद्योगिक वसाहती त असलेल्या कंपन्यांना गावात सुविधा निर्माण करण्यास भाग पाडले होते,मनमिळावू स्वभावाचे सर्वांच्या भावना ,समस्या शांततेने ऐकून घेणारे अशी ओळख असणारे ,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी लक्षात घेऊन यांची या पदी नियुक्ती करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे,सन २००७-२२ पर्यंत या पदावर असणारे विलास नेरकर यांनी १५वर्षाच्या कारकिर्दीत पक्ष वाढीसाठी कोणत्याही प्रकारचे कार्य न केल्याने त्यांच्यावर अकार्यक्षम तेचा ठपका ठेवत पायउतार करण्यात आला, त्याच्या कार्यकाळात एकही सभा या विधानसभा क्षेत्रात झाली नसल्याने असंख्य पदाधिकारी नाराज होते ,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजुभाऊ वैध, मा टेमुर्डे साहेब सुनील देहगावकार जिल्हा उपाध्यक्ष अविनाश ढेंगळे ,जिल्हा सरचिटणीस राजू वरघणे शहरअध्यक्ष बंडू भोगाडे तालुकाअध्यक्ष विशाल पारखी शहर उपाध्यक्ष चंद्रकांत कुंभारे विधानसभा उपाध्यक्ष बंडू खारकर नितेश भांदेकर,अतुल वानखेडे, अरुण सहारे,रंजना पारशिवें मुकेश वाटकर, तात्यांजी चौधरी, बापूराव नंनावरे,श्रीहरी पावडे,लता हिवरकर, जनाबाई पिंपळशेंडे सुशीला तेलमोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जयंत टेमूडे याना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या