वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार राज्यभर डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS) मोबाईल अॅप द्वारे ई–पिक पाहणी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
नोंदणी कालावधी :
शेतकरी स्तरावरून : ०१ ऑगस्ट २०२५ ते १४ सप्टेंबर २०२५
सहायक स्तरावरून : १५ सप्टेंबर २०२५ ते २९ ऑक्टोबर २०२५
या प्रकल्पाअंतर्गत शेतकरी व सहायक स्तरावरून मोबाईल अॅपच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना होणारे फायदे :
नैसर्गिक आपत्तीमुळे खरोखरच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाची मदत तात्काळ व वेळेत मिळणार.
सर्व प्रकारच्या पिकांची नोंद डिजिटल पद्धतीने करता येणार.
भविष्यातील योजनांचा लाभ मिळविण्यासाठी ही नोंदणी अत्यंत महत्त्वाची.
???? ई-पिक पाहणी अॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक :
e-peek.mahabhumi.gov.in/demo/aap_download
म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करून निश्चित कालावधीत पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन महसूल उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव यांनी केले आहे.