कारंजा:- (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे)दि.१० जून २०२३ रोजी कारंजा तालुक्यातील शेवती येथे कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय राजेंद्र पाटणी साहेब यांचे शुभ हस्ते २५१५अंतर्गत शेवती ता.कारंजा येथे हनुमान मंदीर जवळ सभामंडप बांधकाम करणे आणि २५१५अंतर्गत शेवती ता. कारंजा येथे मुंगसाजी माऊली मंदीर येथे सभामंडप बांधकाम करणे या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. त्यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना सांगितले की, मतदार संघात आपण विकास काम जोमाने करीत आहे. आपले एक लाख हेक्टर जमीन सिंचनखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. कारंजा शहराचा विकास सुरू आहे. हे सर्व आपले सरकार असल्याने आणि विशेषता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या विदर्भ क्षेत्रातील असल्याने शक्य होत आहे. पुढे बोलतांनी त्यांनी सांगीतले की सरकार सर्व सामान्यांकरीता प्राधान्याने काम करीत आहे.
कार्यक्रमात भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे यांनी मार्गदर्शन केले. व्यासपिठावर भाजपा तालुका अध्यक्ष डॉक्टर राजीव काळे, भाजपा जैन प्रकोष्ठचे ज्ञायक राजेंद्र पाटणी ,जिल्हा उपाध्यक्ष अनिल कानकिरड, तालुका उपाध्यक्ष राजीव भेंडे, तालुका सरचिटणीस संकेत नाखले, तालुका चिटणीस सुरेश गिरमकार, पंचायात समिती सदस्य दिनेश वाडेकर पंचायत समिती सदस्य शुभम बोनके, सा. बांध.कनिष्ठ अभियंता वानखडे, गणेश गांजरे, गजानन महाराज गांजरे, मंगेश सावके ,स्वाती राठोड, पुष्पाताई देवळे, देवानंद देवळे , रमेश राठोड, तारासिंग महाराज इत्यादीसह अन्य मान्यवर होते. कार्यक्रमांत गावातील नंदू देवळे, विनोद गांजरे , गोपाल गांजरे, विश्वासराव गांजरे, शंकर गांजरे, संजय गांजरे, सुनील गांजरे, इत्यादीसह गावातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. व्यासपिठावरील मान्यवरांचा हस्ते कामाच्या नाम फलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश गांजरे यांनी केले. असे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार पाटणी यांचे स्वीय सहाय्यक संजय भेंडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळविले आहे.