वाशिम, : 15 ऑक्टोबर या सामाजिक न्याय विभागाच्या स्थापना दिवसाच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना ओळखपत्र वाटप व ज्येष्ठ नागरीकांचा सन्मान करणे या कार्यक्रमाचे आयोजन 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्थापना दिन कार्यक्रमास सर्व नागरीकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले असल्याचे महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.