कारंजा : उकर्डा ता.कारंजा येथील गावकरी नागरिकांशी रा.कॉ शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.श्याम जाधव(नाईक) यांनी दि.१० ऑगस्ट रोजी सुसंवाद साधला.यावेळी नागरिकांना महाविकास आघाडी सोबत राहण्याचे आव्हान केले.शेतकरी शेतमजूर,सुसुक्षित बेरोजगार,आदी विषया बाबत केंद्र व राज्य सरकार उदासीन असल्यामुळे असंख्य समस्या निर्माण झाले आहे.त्या सोडविण्या करिता आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून द्यावा,ज्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार आणण्यास मदत होईल. भुलथापा देऊन मताचे विभाजन करणाऱ्या संधी साधू उमेदवारा पासून मतदारांनी सावध राहावे अशे आव्हान सुद्धा डॉ.श्याम जाधव(नाईक) यांनी केले.यावेळी शेतकरी नेते डॉ.विठ्ठलराव घाडगे,रमेश जाधव व गावातील जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.