कारंजा : स्वातंत्र्योत्तर काळापासून आजता गायत कारंजा विधानसभा मतदार संघावर बाहेरगावच्या उमेद्वारांनीच निर्विवाद सत्ता गाजवलेली असली तरी देखील बऱ्याच वेळी,स्थानिक उमेदवारांची चर्चा देखील चांगलीच रंगलेली दिसून येत होती.मात्र बरेच वेळा स्थानिक उमेद्वार नसूनही बाहेरच्या उमेद्वारांनी आपल्या कतृत्वाने कारंजा विधानसभा मतदार संघातील मतदारांचा विश्वास बऱ्यापैकी संपादन केल्याचे दिसून आलेले असल्यामुळे,कारंजा विधानसभा मतदार संघातील मतदारांनी वेळोवेळी स्थानिक उमेद्वाराची मागणी बाजूला सारून प्रत्येक वेळी बाहेरच्याच उमेद्वाराला आपले लोकप्रतिनिधी म्हणून निवडून विधानसभेत पाठवले आहे. त्यामुळे याहिवेळी परत एकदा बाहेरच्या उमेद्वाराची सरशी होणार.ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.सध्याच्या राजकारणामुळे स्थानिक मतदार जनता महायुतीच्या राजकारणाला कंटाळल्याचे दिसून येत असून त्याचा प्रत्यय येथील मतदारांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीमधून दाखवून दिला आहे.यावरून लोकांना विधानसभेतही परिवर्तन हवे असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.त्यामुळे स्थानिक मतदार महाविकास आघाडीचा सक्षम व विश्वासू उमेद्वार म्हणून सुनिल पाटील धाबेकर यांचेकडे आशेने पहात आहे.सुनिल बाबासाहेब धाबेकर हे गेल्या पाच ते दहा वर्षापासून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात सक्रिय आहेत. त्यांनी कारंजा मानोरा विधानसभेची आपली कर्मभूमी म्हणून निवड केलेली असून, मतदार संघात ते बऱ्यापैकी सक्रिय असून, अहोरात्र येथील मतदारांच्या छोट्या मोठ्या समस्या सोडवीत आहेत.काँग्रेसचे निष्ठावान नेते, सहकार नेते म्हणून मराठा समाजात ते ओळखले जातात.सुनिल पाटील धाबेकर हे गुरुमाऊली परिवारातील भाविक भक्त म्हणूनही ओळखले जातात. चारित्र्यसंपन्न असलेल्या सुनिल पाटील धाबेकर यांचा क्रिडा,शैक्षणिक,सामाजिक, धार्मिक,आध्यात्मिक,सांस्कृतिक क्षेत्राशी जवळचा संबंध आहे. शिवाय त्यांच्या वडिलांनी योजना महर्षी स्व.बाबासाहेब धाबेकर यांनी कारंजा विधानसभा मतदार संघाचे सलग दोन वेळा प्रतिनिधीत्व केलेले आहे. "शासनातील अधिकारी वर्गावर जबरदस्त पकड ठेवून, जनसामान्याची कामे करणारा कर्तव्यतत्पर जाणता राजा म्हणून त्यांचा नावलौकीक होता." कारंजा विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावखेड्याच्या रस्त्याची बांधणी आणि डांबरीकरण होऊन प्रत्येक गाव खेडे त्यांच्या काळातच कारंजा तालुक्याच्या कार्यालयाशी व बाजारपेठेशी जोडल्या गेले होते. शिवाय थेट पिंप्री फॉरेस्ट येथील अडाण धरणातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाईपलाईन टाकून त्यांनी कारंजेकर नागरीकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवीला होता.त्यांचे हे कार्य कारंजातील नागरीक कदापीही विसरू शकणार नाहीत.आज कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात स्व.बाबासाहेब धाबेकर यांचा व त्यांच्या पश्चात सहकार नेते सुनिल पाटील धाबेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा फार मोठा चाहता वर्ग,सर्वच पक्षात असलेला पण वेळप्रसंगी सुनिल पाटील धाबेकर यांच्या सोबत रहाणारा मित्रमंडळीचा गोतावळा,आप्त स्वकिय समाज सुनिल पाटील धाबेकर यांच्या सोबत असून काहीही झाले तरी "अबकी बार सुनिल धाबेकर हमारे आमदार" अशी घोषणाच देत आहे.तसेच यातही महत्वाचे म्हणजे महाविकास आघाडी पक्षाला जर कारंजा मानोरा विधानसभा महाविकास आघाडीकडे खेचून आणायचा असेल तर सुनिल पाटील धाबेकर यांच्या व्यतिरिक्त अन्य दुसरी व्यक्ती पर्याय असूच शकत नाही. सुनिल पाटील धाबेकर यांच्या सारखा प्रामाणिक, मनमिळाऊ,विश्वासू, हजरजवाबी,कार्यतत्पर व सर्वांच्या आवडीचा दूसरा नेता असूच शकत नाही. सुनिल पाटील धाबेकर यांना कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाची उमेद्वारी जाहीर होणे.म्हणजेच महाविकास आघाडीचा आजच विजय होणे होय.असे वृत्त मतदार संघातील कारंजा,कामरगाव, उंबर्डा बाजार,पोहा, धामणी, धनज,मानोरा, दापुरा, कुपटा, शेंदुरजना इत्यादी गावातील मतदारांची प्रत्यक्ष भेट घेवून निवडणूक पूर्व त्यांची मते जाणून घेतली असता त्यावर महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेने आपले निरीक्षण नोंदविले असल्याचे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी प्रसिद्धी करीता कळवीले आहे.