जीवन हे अनमोल आहे."एकदा गेलेला जीव हा परत मिळत नाही.आपण मृत्युनंतर जगासाठी केवळ मृतात्मा असता.तर स्वतःच्या कुटूंबासाठी त्यांचे सर्वस्व असता.त्यामुळे प्रवासात कोणत्याही प्रकारची घाई करू नका.हळूवारपणे आपल्या वेगमर्यादेतच वाहने चालवा. आपले वाहन मग ते कोणतेही असो.सुस्थितीत आहे किंवा नाही.याची दररोज पडताळणी करा.शक्यतो खाजगी वाहनांचा आणि त्यातही लक्झरी बसेसचा प्रवास टाळा.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सर्वोतोपरी सुरक्षित असतात.या गाड्याचे वाहन चालक प्रशिक्षित अनुभवी व प्रवाशांशी सौजन्याने वागणारे असतात.या गाड्यांची व्यवस्थित देखभाल असते.प्रवासात अचानक वाहन बिघडले.नादुरुस्त झाले तर ते प्रवाशाला वाऱ्यावर न सोडता,दुसऱ्या बसची सुविधा करून देतात.यातही महत्वाचे म्हणजे महामंडळ कर्मचारी दारू पिऊन किंवा व्यसन करून कर्तव्यावर केव्हाच नसतात.आणि म्हणूनच महामंडळाचा प्रवास सुखकर असतो याउलट लक्झरी गाड्याची व्यवस्थित देखभाल नसते.चालक वाहक प्रशिक्षित व अनुभवी नसतात.यांचेवर कुणाचे नियंत्रण नसल्याने हे दुर्व्यसनी असू शकतात. प्रवाशांशी हे सौजन्याने वागतही नाहीत.यांना लवकर पोहचण्याची,जास्त ट्रिपा मारण्याची,जास्त प्रवाशी घेऊन केवळ येन तेन त्या मार्गाने पैसा मिळविण्याची घाई असते.त्यामुळे त्यांची पुरेशी झोपही होत नाही.व त्यांना वाहन चालवतांना डुलक्या लागतात.व त्यामुळे खाजगी वाहन मग लक्झरी असो की,कालीपिली किंवा खाजगी कार यांचे अपघात जास्त होतात.त्यामुळे वाढते अपघात पहाता आज प्रत्येक प्रवाशाने प्रवासाला निघतांना विचार करण्याची गरज आहे. व शासनाने सुद्धा खाजगी वाहने आणि वाहन चालक यांचे करीता नियमावली करून संभाव्य अपघात टाळणे अत्यावश्यक आहे. तसेच यापुढे खाजगी वाहन धारक असो किंवा महामंडळ असो त्यांनी प्रवाशांचे नाव , गाव, आधारकार्ड याची कोठतरी नोंद ठेवणे सुद्धा गरजेचे आहे. असे मत खुद्द अनेक प्रवाशांनी प्रगट केले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी कळवीले आहे.