विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबत,शारिरीक क्षमतेत वाढ व सुप्तावस्थेत असलेल्या सुप्तकलागुणांना वाव देण्यासाठी जवाहरलाल नेहरू विद्यालय तथा उच्च माध्यमिक शाळा जोगीसाखरा येथे तीन दिवशीय वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
उद्घघाटनिय कार्यक्रमाचे उद्घाटक सौ.वृंदाताई गजभिये माजी प.स.सदस्य आरमोरी, कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य खरकाटे,प्रमुख पाहुणे सुनील पनगंटीवार मुख्याध्यापक जि प शाळा शंकरनगर,सौ.शालिनी मोहूर्ले,सौ.सविताताई येळमे,सौ.निर्मला भोयर,देविदास ठाकरे ग्रापस जोगीसाखरा,श्री विजय सहारे उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रश्न मंजूषा स्पर्धेत भाग घेतले त्यासोबत क्रीडेत सहभाग घेऊन क्रीडा प्रकारात निपुनता दाखवीत विभागीय क्रीडा स्पर्धेत शालेय चमूने खो-खो प्रकारात तिसरा क्रमांक पटकावला.
विद्यार्थी यांनी उदघाटकीय कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रकारचे नृत्याचे अविस्मरणीय असे कार्यक्रमाची रचना केली त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन झाले आणि नवीन वर्षाची सुरवात केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रवीण ढोरे,प्रास्ताविक व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.इंद्रजित डोके यांनी केले.