आरमोरी : अनंत श्री विभूषीत जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांचा पादुका दर्शन सोहळा व सामाजिक उपक्रमाअंतर्गत दुर्बल घटकांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम सोमवार, दि. १६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. रामानंद संप्रदाय जिल्हा सेवा समिती, गडचिरोली यांच्या वतीने हा भव्य कार्यक्रम हितकारणी उच्च माध्यमिक विद्यालय, आरमोरी येथे होणार आहे.
या सोहळ्यानिमित्त आरमोरी शहरातून भक्तीमय वातावरणात भव्यदिव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रेत आदिवासी रेला नृत्य, रामदरबार झाँकी, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासह रक्तदान, वृक्षारोपण, कलश यात्रा व विविध सामाजिक संदेश देणाऱ्या आकर्षक झाँक्यांचा समावेश राहणार आहे.
यानंतर कार्यक्रमस्थळी गुरूपूजन सोहळा, तसेच सामाजिक उपक्रमांतर्गत दुर्बल घटकांना साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुढे प्रवचन व उपासक दीक्षा होऊन कार्यक्रमाची पुष्पवृष्टीने सांगता करण्यात येणार आहे.
या धार्मिक व सामाजिक उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रामानंद संप्रदाय जिल्हा सेवा समिती, गडचिरोलीचे जिल्हा निरीक्षक विजय गडपायले, जिल्हा सेवा अध्यक्ष प्रकाश कुनघाडकर, तालुका अध्यक्ष रामकृष्ण तामसेटवार, उत्सव समिती अध्यक्ष महेंद्र दहिकर, महिला अध्यक्षा कविता कुथे, जिल्हा सचिव अतुल धात्रक, जिल्हा कर्नल लोमेश भांडेकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख लोमेश बुरांडे, युवा अध्यक्ष किशोर चिमुरकर, कृष्णाभाऊ खरकाटे, संदीप सरपे, कविता चिळंगे यांच्यासह उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....