जिल्ह्यातील कारंजा नगरीतील श्री सिध्देश्वर महादेव म्हणजे श्रीक्षेत्र शिंगणापूर महादेवाचे प्रतिरूप असून, जेवढे महत्व पश्चिम महाराष्ट्रातील शिंगणापूरच्या महादेवाला तेवढेच महत्व कारंजा नगरीतील श्री सिद्धेश्वराला आहे . श्री सिद्धेश्वर महादेव हे जागृत देवस्थान असून येथे केलेली पूजा श्रीक्षेत्र शिंगणापूरच्या महादेवाला अर्पण केली जात असून, थेट कैलासामध्ये शिवपार्वतीला पोहचत असल्याची आख्यायिका आहे . कारंजा शहरातील बेंबळपाट परिसराजवळ असलेल्या लोकमान्य व्यायाम शाळेजवळ हटोटीपूर्यामध्ये हे शिवमंदिर असून, दर सोमवारी, महाशिवरात्री, श्रावणात येथे भाविक भक्तांची वर्दळ असते आज चैत्र शु एकादशी निमित्त येथे भाविक भक्तांची मांदियाळी बघायला मिळत आहे . असे वृत्त जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाचे दिंडी प्रमुख संजय कडोळे यांनी कळविले आहे .