वरोरा :- शहरातील भिवदरे लेआउट मध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी राधिका उमराव देवडा वय 65 वर्ष यांच्या घरी अज्ञात चोरट्यानी चोरी करून एक लाख 56 हजार 320 रुपयांचा सोने चांदीचा ऐवज सह 2000 हजार रुपये लंपास केले. ही घटना आज दि. 12 जुलै रोजी उघडकीस आली.
राधिका उमराव देवडा वय 65 वर्ष राहणार भिवदरे लेआउट ही महिला सुनील गेडाम यांच्या घरी किरायाने राहते. तिला दोन मुली असून त्यांचे लग्न झाल्याने त्या दोघे आपल्या सासरी राहत असल्याने घरी एकट्यास होत्या.
दि. 6 जुलै रोजी राधिका देवडा या जयपूर येथे नातेवाईकांच्या लग्नाकरिता गेल्या घरी कोणीच नसल्याने माझी मावशी देवडा हिने मनोज पूनमचंद चव्हाण याला लक्ष ठेवण्यासाठी सांगितले. आज 12 जुलै ला सकाळच्या सुमारास पाहले असता मावशीच्या घराचा ताला तोडलेला दिसला घरात प्रवेश करून पाहिले असता अलमारीचा ताला तोडलेला दिसला. अलमारीत असलेले बिंदिया 10 ग्राम, सोन्याचे लॉकेट 3 ग्राम , सोन्याचे नाणे 3 ग्राम, सोन्याची अंगठी 4 ग्राम , चांदीचे पायल 160 ग्रॅम चांदीचे दागिने व रोख 2000 रुपये असा एकूण एक लाख 56 हजार 320 रुपयांचा ऐवज मनोज चव्हाण यांनी आज पोलीस स्टेशन गाठून चोरीच्या बाबत तक्रार नोंदविले. चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस पोलीस अधिकाऱ्यांनी यावर अंकुश लावणे गरजेचे झालेले आहे.