कारंजा:- यावर्डी येथे कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय राजेंद्र पाटणी साहेब यांच्या शुभ हस्ते रोजगार हमी योजने अंतर्गत विविध कामांना प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या विवीध कामांचे प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मंजुरात प्राप्त पत्राचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात आले. तसेच या योजने अंतर्गत मंजूर विष्णू आमले यांच्या शेतातील विहिरीचे भूमिपूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ राजीव काळे होते.महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वाशीम जिल्ह्यातील यावर्डी येथे विशेष प्रकल्प राबविण्यात आला.या धडक कार्यक्रमात
येथील शेतकऱ्यांच्या जवळपास 75 सिंचन विहरी प्रस्तावीत कऱण्यात आल्यात तसेच 15 जनावरांचे गोठे प्रस्तावीत कऱण्यात आले होते. इत्यादी विविध कामांना तसेच 41 विहिरी आणी 15 जनावरांच्या गोठ्यास मंजूरी मिळाली असल्याची माहिती उपस्थित अधिकारी व किशोर देशमुख यांनी दिली.प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

आमदार राजेंद्र पाटणी यांच्या विशेष प्रयत्नाने कारंजा तालुक्यातील पंधरा गावांमध्ये ही योजना विशेष करून राबविल्या जात आहे तसेच मानोरा तालुक्यात काही गावे प्राधान्य क्रमाने घेण्यात आली आहेत . कार्यक्रमात आ. राजेंद्र पाटणी साहेब , भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे, उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे, गटविकास अधिकारी, तसेच किशोर देशमुख यांनी मार्गदर्शन केले.आ. राजेंद्र पाटणी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले सिंचन विहीरी , जनावरांचे गोठे इत्यादि ज्या काही योजणा असतील त्याचा लाभ घ्यावा. तसेच जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात यावा असे उपस्थित नागरीक आणि अधिकाऱ्यांना सांगतो. या कार्यक्रमा अन्तर्गत रोजगार सुद्धा मिळणार आहे.रोजगार हमी योजने अंतर्गत विकास योजना राबवून मतदार संघातील विवीध गावांतील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या जावू शकतात परंतु या योजनेची अंमबजावणी प्रभावीपणे राबवावी लागते त्या अनुसंगाने मतदार संघातील अनेक गावं प्रायोगिक तत्वावर निवडल्या गेली आहेत. जास्तीत जास्त शेतकरी मजुर यांना यावेळी उप विभागीय अधिकारी वऱ्हाडे , गट विकास अधिकारी राठोड, तालुका कृषी अधिकारी जटाळे,सरपंच सौ विद्या ताई परमेश्वर आमले, भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे,अमोल बिजवे, सरपंच मुगल आखतवाडा, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मंगेश धाने, संजय लाहे, सरपंच धानोरा गजानन कदम, रवि पाटिल सराफ, हर्षल ठाकरे, दिवाकर सराफ गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गिरधर बोनके,तुफान बोनके,कैलाश कापसे,हरिकिसन हागोने ,विठ्ठल अमाले ,विशाल बोनके,कृष्णा ठाकरे,उमेश चौधरी,संदीप पारे इत्यादी सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास सबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपिठावरील मान्यवरांचा गावातील नागरिकांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक किशोर देशमुख यांनी केले तर संचलन बाळूभाऊ पोहेकर यांनी केले. असे वृत्त आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....