गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील शेरपार जंगलात शिकार केलेल्या वाघाची कातडी विकत घेणार्या छत्तीसगड राज्यातील बिजापूर येथील काहींना बिजापूर वनविभागाच्या अधिकार्यांनी वाघाच्या कातडीसह अटक केली. दरम्यान या घटनेच्या तपास करीत असताना बिजापूर वन विभागाच्या अधिकार्यानी यात सहभागी असलेल्या वीस जणांना आत्तापर्यंत अटक केली असून गोंदिया जिल्ह्यातील आमगाव व सालेकसा तालुक्यातील 11 जणांचा यात समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. आमगाव व सालेकसा येथील आरोपींना 8 जुलै रोजी बिजापूर वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. वाघाची कातडी कुठून आणली याचा सविस्तर तपास करतांना पकडण्यात आलेल्या आरोपींनी महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्हा बॉर्डरवरून आणल्याचे सांगितले. त्यानुसार बिजापूर पोलिसांनी सालेकसा तालुक्यातील मुख्य आरोपी आणि आमगाव तालुक्यातील कातडी विकण्यास मदत करणाऱ्या आरोपींना अटक केल्याने जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ माजली आहे.
जिल्ह्यात नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्प असून जिल्ह्याला लागूनच मध्यप्रदेश राज्यातील जंगलभागही आहे. याचा फायदा घेत वन्यप्राण्यांची तस्करी करणारी टोळी जिल्ह्यात सक्रीय असल्याचे याप्रकरणावरुन समोर आले आहहे. सालेकसा जंगलातून एका वाघाची शिकार केली आणि ही कातडी नखे, हाडे आणि मिशीचे केस हे छत्तीसगड राज्यातील बीजापूर येथील सीआरपीएफचे सब इन्स्पेक्टर अमित झा आणि त्याच्या 20 सहकाऱ्यांना कातळी विकली. याबाबत विजापूर वन विभागाने कारवाई करत अमित झा यांच्यासह वीस जणांना या गुन्हामध्ये आरोपी करून त्यांना अटक केली. सविस्तर तपास केला.असता ही वाघाची कातडी सालेकसा तालुक्यातील शेरपार जंगलातून वाघाची शिकार करून ही कातळी विकल्याचे समोर आले. यामध्ये मुख्य आरोपी शालिक मरकाम वय 55, कोसाटोला / मुरुपार, सुरज मरकाम वय 45 कोसाटोला / मुरुपार, जियाराम मरकाम, नवाटोला सालेकसा या तिघांनी वाघाला करंट लावून मारल्याचे कबूल केले. तसेच घटनास्थळावरून वाघाच्या हाडाचे तुकडे मिळाल्याचे छत्तीसगड वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वाघाचे नख आणि मिशीचे केस विक्री करणे असल्याचे आरोपींनी सांगितले. या तिघांना वाघाची कातडी विकण्यासाठी मदत करणाऱ्या आरोपींमध्ये गेंदलाल भोयर वय 55, लभानधारणी, तुकाराम बघेले वय 59, भाडीपार, अंगराज कटरे वय 67 दरबडा, वामन फुंडे वय 60, सिंधीटोला, या चार आरोपींना सालेकसा तालुक्यातून अटक करण्यात आली. तर विक्रीमध्ये मदत करणारे आमगाव येथील शामराव शिवनकर 53 वर्ष, रेल्वेमध्ये नोकरी करणारे जितेंद्र पंडित, नालंदा बिहार सध्या मु. आमगाव, यादवराव पंधरे बोदरा जि. भंडारा, अशोक खोटेले वय 50, गुदमा गोंदिया अशा अकरा लोकांना बीजापूर येथील वन अधिकाऱ्यांनी अटक केली असून या सर्वांना विजापूर छत्तीसगड येथे नेण्यात आले आहे.