अकोला -भारतीय जनता पार्टीची स्थापना होउन ४२ वर्षे झाली असून,भाजपाच्या सदस्य संख्यामध्ये प्रचंड वाढ होउन सम्पूर्ण जगात भाजपा प्रथम क्रमांकचा पक्ष बनला आहे, त्यामुळे आज गाव तेथे भाजपा झाली असून प्रत्येक घरात भाजपा सदस्य करण्याचे कार्य भाजपा बूथ प्रमुख तसेच प्रत्येक कार्यकर्त्या करीत आहे, याचा अभिमान ज्यांनी जनसंघापासून कार्य केले अश्या प्रत्येक कार्यकर्त्याला असल्याचे विचार यावेळी भाजपा नेते, प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ अशोक ओळंबे यांनी व्यक्त केले, यावेळी महाआरोग्य शिबीर,उन्हाची तिव्रता पाहता पश्यांसाठी जलपात्र,उन्हात कार्य करणाऱ्या सफाई कामगार व हातमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांसाठी दुपट्टे, होमिओपॅथीक औषधीचे वाटप व पेढे वाटून भाजपा स्थापना दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे,माजी सैनिक सुभाष पाटील म्हैसने,किशोर रत्नपारखी,श्रीमती माधुरी क्षीरसागर,सौं मंगला ताई म्हैसने,डॉ सुभाष लव्हाळे,संजय चौधरी,वसंतराव पाटील,गजानन गोलाईत,अड संतोष गोळे,राजाभाऊ देशमुख,किशोर वडतकर,सौं अलका देशमुख,साई कामिना डोंगरे,नारायण उंबरकर,आशुतोष काटे,नंदू जाधव,आशिष शर्मा,सेलसिंग सिसोदीया,अशोक भिलकर, अशोकराव कंकाळे विश्वास मानकर, तुळशीराम हिंगणे,तुषार पाटील,प्रकाश नानकदे,आनंद जैन, कैलास गोळे,उमेश जानोरकर गजानन मुरडीव,अरुण मानकर, नितीन बदरखे,विक्की दुर्गीया, शुभम टोम्पे यांची उपस्थिती होती डॉ प्रकाश मेटांगे, डॉ विवेक गोतमारे, डॉ शिवाजी पाटील, डॉ प्रीती घोंगे,डॉ सुभाष बढे,डॉ प्रवीण अग्रवाल,डॉ काजल अडिया,डॉ पूजा घटाळे, डॉ धंनजय शेळके,डॉ जुगल चितलांगे, डॉ सरोज शेळके,डॉ राजेश वर्धेकर,डॉ कुंडलवाल, डॉ तेजराव नराजे,डॉ राधेश्याम अटल, प्रा पाथरीकर, श्री बदरखे, श्री मांडवे,यांनी आपली सेवा प्रदान केली.विविध ठिकाणी संम्पन्न झालेल्या कार्यक्रमाला कर्ता हनुमान मंडळ अकोला,सत्य साई सेवा संघटना अकोला, स्व सुनीलभाऊ क्षीरसागर मित्र मंडळ अकोला, अग्निपंख बहुउध्येशीय संस्था अकोला गुड मॉर्निंग ग्रुप अकोला यांचे सहकार्य लाभले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....