कारंजा [जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे] : "राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री स्व.बाबासाहेब धाबेकर हे शेवटपर्यंत राजाप्रमाणे जगले.ते कुशल प्रशासक तर होतेच तसेच प्रशासनातील गाढ अभ्यासक असल्याने त्यांचा अधिकारी वर्गावर मोठा दबदबा होता. त्यांनी जी कामे हाती घेतली ती पुर्णत्वास नेण्याचा पुर्ण प्रयत्न केला.म्हणून त्यांची ओळख संपूर्ण विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रात होती." असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री संजय देशमुख यांनी कारंजा येथे स्व.बाबासाहेब धाबेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत सभेत बोलतांना काढले.
याबाबत पुढे बोलतांना संजय देशमुख म्हणाले की, "स्व बाबासाहेब धाबेकर यांनी अकोला जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष असतांना राबविलेल्या योजना आजतागायत ग्रामीण जनतेच्या आठवणीत आहेत. ते मंत्री असतांना जलसंधारणाची कामे खूप मोठया प्रमाणात त्यांनी राज्यभर केली.त्यामुळेच सुशिलकुमार शिंदे यांच्या मंत्री मंडळात त्यांचे जलंसंधारणाचे काम पाहून बंधार्यांना धाबेकर बंधारा असे नाव शासनाच्या वतीने देण्यात आले." असे देशमुख म्हणाले. बाबासाहेब धाबेकर यांच्या प्रमाणेच त्यांचे सुपूत्र सुनिल पाटील धाबेकर यांचा जनसंपर्क देखिल दांडगा असून शेतकरी व शेतमजूर यांच्यासाठी त्यांनी सुरु केलेले काम निश्चितच प्रशंसनीय असल्याचे सांगतांना संजय देशमुख यांनी सुनिल धाबेकरांना राजकारणांसह समाजकारणाकडे आपण देत असलेले लक्ष देखिल वाखाणण्याजोगे असल्याचे सांगितले.
कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघातील सुनील पाटील धाबेकर मित्र परिवाराच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी स्थानिक धाबेकर सांस्कृतिक सभागृह येथे स्व.बाबासाहेब धाबेकर जयंती कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी व्यासपिठावर जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा अकोला जिल्हा परिषदेचे गटनेते सुनील पाटील धाबेकर, वीज मंडळाचे माजी सदस्य तथा कॉंग्रेस नेते अनिल राठोड, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, ज्येष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकिरड, वाशिम बाजार समितीचे सभापती दामुअण्णा गोटे, भाऊसाहेब काळे,माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया, माजी नगरसेवक एम.टी.खान,माजी उपनराध्यक्ष जुम्माभाई पप्पुवाले, माजी सभापती प्रकाश आप्पा निंबलवार,सुरेंद्र देशमुख माजी खरेदी विक्री अध्यक्ष मानोरा,रमेश जाधव,रा.काँ.पार्टी मानोरा,माजी पं.स.सदस्य किशोर पाटील लाहोरे, रामकृष्ण भगत, ता.अध्यक्ष काँग्रेस पार्टी, राज चौधरी, सुरेश पाटील पोले, गजानन अमदाबादकर, मानोराचे इफ्तेखार पटेल, डॉ.श्याम जाधव, जिल्हा परिषद सदस्य दत्ता पाटील तुरक, माजी सभापती अशोकराव मुंदे,कारजा पत्रकार मंचचे दिलीप रोकडे, बालचंद्र जाधव, संतोष दुर्गे, मनोज कानकीरड, सुरेश पारे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश दवंडे यांनी तर सूत्रसंचालन विजय मापारी यांनी केले. तर विजय पाटील काळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला राष्ट्रीय कॉंग्रेसचे कार्यकर्ते तथा बाबासाहेब धाबेकर यांचे चाहते बहुसंख्येने उपस्थित होते. "त्यांच्या हजारो चाहत्यांच्या सर्वपक्षीय जनसागरामुळे आजही स्व बाबासाहेब धाबेकर जनतेच्या हृदयात जीवंत असल्याचा प्रत्यय येत होता." असी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी यावेळी माध्यमाकडे व्यक्त केली. कार्यक्रमासाठी तुळशिराम तायडे,माजी बाजार समिती सचिव वाळके,अशोक पाटील दहातोंडे, अशोक पाटील वानखेडे,रमेश पाटील मुंदे, श्रीकृष्ण पाटील,विजय पाकडू, अण्णा पाटील मुंदे,राज चौधरी, संजय राठोड,वईद भाई,गजानन भुरे,जिवन जाधव,पांडूरंग तिकोडे,बाळू पा. इंगोले, गोपालराव दवतडे,विलास देशमुख,पद्माकर गोडसे, प्रदिप वानखेडे, संजय कडोळे, राजिक भाई, अशोकराव मुंदे,विलास सुरळकर,पांडूरंग पा. हिंगणकर, मनोज पा. दहातोंडे, विठ्ठलराव लाड रामदास व्यवहारे,भाऊराव पाटील चौधरी, मनोज कानकिरड रा.कॉ. तालुका अध्यक्ष ,बालचंद जाधव आदींनी अथक परिश्रम घेतले.
याप्रसंगी सुनील धाबेकर बोलताना म्हणाले की, "स्व.बाबासाहेबांनी शून्यातून विश्व निर्माण केले होते.एका माणसात किती शक्ती असू शकते,त्याचे ते मूर्तीमंत उदाहरण होते. सूतगिरणी असो की शैक्षणिक संस्था अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपली छाप सोडली.ज्या गोष्टीत त्यांनी हात घातला त्यात यश मिळवले असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते." असे बोलताना त्यांनी कॉंग्रेसचे निष्ठावंत नेते स्व.केशवराव खोपे यांच्याही कार्यकर्तृत्त्वाचा गौरवही केला. याप्रसंगी व्यासपिठावर उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....