आज १ एप्रिल २०२४ रोजी यवतमाळ कडून येणाऱ्या एमएच २९ बीव्ही १८२१ या वाहनाची
तपासणी केली असता
जाकीर उल्ला खान व नजीम उल्ला खान आताऊल्ला खान राहणार नेर तालुका जिल्हा यवतमाळ यांच्याजवळ लाल रंगाची
कापडी पिशवी मध्ये रोख रक्कम ३ लाख ६३ हजार रुपये रक्कम आढळून आली. सदर रकमेबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही पुरावे
आढळले नाही. सदर रक्कम ए. आर. खान एचपी पेट्रोल पंप यांची वसुली कॅश आहे असे त्यांनी सांगितले आहे.कार्यवाही पथक प्रमुख एस एस मिसाळ व इतर तीन यांनी हि रक्कम जप्त करून पुढील कारवाईकरीता सदर रक्कम ठाणेदार प्रवीण खंडारे ग्रामीण पोलीस स्टेशन कारंजा यांच्या ताब्यात देण्यात आली.
उपरोक्त कार्यवाही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा वाशिम जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस., सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे,
यांच्या मार्गदर्शनाखाली सोमठाणा येथील स्थिर सर्वेक्षण पथकातील स्थिर सर्वेक्षण पथकातील सदस्य प्रथक प्रमुख संतोष मिसाळ, धनंजय चौधरी, संजय राठोड, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री महाकाळ व पथकातील कर्मचारी यांनी केली आहे.